मराठी बातम्या  /  क्रीडा  /  मुंबई संघटनेच्या पाठीशी शरीरसौष्ठवपटूंची ताकद, खेळाडूंना आता न्याय मिळणार?

मुंबई संघटनेच्या पाठीशी शरीरसौष्ठवपटूंची ताकद, खेळाडूंना आता न्याय मिळणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 17, 2023 11:24 AM IST

mumbai bodybuilders association : गेली १० वर्षे मुंबईतील शरीरसौष्ठवपटू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित आहेत. खेळडू कामगिरी करूनही ते वंचित राहिले, त्यामुळे या शरीरसौष्ठवपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी चेतन पाठारेंच्या संघटेनाला सोडण्याचा निर्णय मुंबईतील इतर शरीरसौष्ठव संघटनांनी घेतला आहे.

bodybuilders association
bodybuilders association

 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईसह महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटू गेल्या १० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करत आहेत. खेळाडूंनी अनेक पदकंही मिळवली आहेत. मात्र, असे असूनही महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनला आपल्या एकाही दिग्गज खेळाडूला कसलाही पुरस्कार मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी आणि त्यांना पुरस्कार मिळवून देण्यासाठी मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी राज्य बॉडीबिल्डिंग संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र, हा निर्णय घेताना खेळाडूंच्या मनात भीतीचे वातावरण होते. पण महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स संघटनेचे सर्वेसर्वा संजय मोरे खेळाडूंसोबत सामील झाल्याने मुंबईतील शेकडो दिग्गज खेळाडू निश्चित झाले आणि त्यांनी मुंबई संघटनेला आपला पाठिंबा दर्शवत आपली पूर्ण ताकद त्यांच्यासोबत उभी केली आहे.

मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची ताकद वाढली

आत खेळाडूंच्या या निर्णयामुळे मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची ताकद वाढली आहे.  महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनशी संलग्न झाली.यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा परिषदेचीही मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे आता मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळू शकणार आहे. सोबतच इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनला ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना एशियन बीच गेममध्येही सहभागी होता येणार आहे.

इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन ही इंटरनॅशनल फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशनला वाडा, स्पोर्ट्स अ‍ॅकॉर्ड, वर्ल्ड गेम असोसिएशन यांची मान्यता असलेली शरीरसौष्ठव क्षेत्रातील एकमेव संघटना आहे.

सव्वाशे शरीरसौष्ठवपटूची फौज सोबत

मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनांनी खेळाडूंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी संजय मोरेंच्या मान्यताप्राप्त संघटनेशी आपली संघटना संलग्न करताच त्यांनी सत्यस्थिती सांगण्यासाठी मुंबईतील सर्वच शरीरसौष्ठवपटूंना बोलावले. तेव्हा मुंबईतील सव्वाशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंची उपस्थिती भारावून सोडणारी होती. खेळाडूंच्या न्यायासाठी मुंबईतील संघटनांनी घेतलेल्या भूमिकेला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला आणि हम तुम्हारे साथ हैचा विश्वासही दिला.

 

WhatsApp channel