मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni : एमएस धोनी कोणती मोठी घोषणा करणार? लाइव्ह येऊन देणार माहिती

MS Dhoni : एमएस धोनी कोणती मोठी घोषणा करणार? लाइव्ह येऊन देणार माहिती

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 24, 2022 10:47 PM IST

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी रविवार २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता मोठी घोषणा करणार आहे.

महेंद्रसिंह धोनी
महेंद्रसिंह धोनी

MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रविवार २५ सप्टेंबर रोजी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी तो उद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लाइव्ह येणार आहे. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार असलेल्या धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला. दरम्यान, आजही धोनीचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावरून धोनीने आपण उद्या सर्वांसोबत एक खास बातमी शेअर करणार असल्याचं म्हटलं आहे. आता धोनी काय निर्णय घेणार आहे, कोणती घोषणा करणार आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घेतली. त्याआधी अखेरचा सामना तो २०१९ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला खेळळा होता. धोनी त्या सामन्यात धावबाद झाला आणि भारताने वर्ल्ड कपही तिथेच गमावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर धोनी आयपीएलमध्ये सीएसकेचं नेतृत्व करतो. धोनी नेमकी काय घोषणा करणार याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.

धोनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, तुमच्यासोबत मी एक बातमी शेअर करणार आहे. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता मी लाइव्ह येऊन याबाबत माहिती देईन. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तिथे असाल.

धोनी अचानक निर्णय घेऊन चाहत्यांना नेहमीच धक्का देतो. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीय. मात्र आयपीएलमध्ये खेळत असल्यानं तो आयपीएलबाबत काही निर्णय घेणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र याआधीच्या त्याच्या घोषणा पाहता आयपीएलबाबत त्याने पोस्टमधूनच काही सांगायचे असते तर सांगितले असते असेही चाहत्यांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमकी कशाची घोषणा धोनी करणार आहे याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग