मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: T20 वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार, धोनीनं सांगितला विजयाचा फॉर्म्युला

MS Dhoni: T20 वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार, धोनीनं सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 25, 2022 04:57 PM IST

ms dhoni live announcement: एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. धोनीने २५ सप्टेंबर (रविवार) रोजी लाईव्ह येऊन एक खास घोषणा केली आहे. धोनीने भारतात एक उत्पादन लाँच केले आहे. विशेष म्हणजे धोनीने या प्रोडक्टला टी-20 वर्ल्ड कप २०२२ शी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

MS Dhoni
MS Dhoni

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २५ सप्टेंबर (रविवार) रोजी एक मोठी घोषणा केली आहे. खरंतर धोनीने भारतात एक प्रोडक्ट लाँच केले आहे. धोनीने २०२२ च्या T20 विश्वचषकाशीही त्या प्रोडक्टचा संबंध जोडला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी धोनीने आपण २५ सप्टेंबर रोजी लाईव्ह येऊन एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते.

शनिवारी सांगितल्याप्रमाणे रविवारी बरोबर २ वाजता लाईव्ह आला. लाखो लोक त्याला लाईव्ह पाहत होते. लाईव्ह येऊन मोठी घोषणा करणार असल्याचे धोनीने सांगितल्यानंतर चाहते तो IPL मधून निवृत्त होणार असल्याचा अंदाज लावत होते. मात्र, असे काहीच झाले नाही.

धोनीने लाईव्ह येऊन ओरियो बिस्किट लाँच केले आहे. यावेळी धोनी म्हणाला की, “हे बिस्किट २०११ मध्ये भारतात आले तेव्हा टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा ओरियो भारतात लाँच होत आहे, त्यामुळे या वेळेचा वर्ल्ड कपही आपणच जिंकणार आहोत” .

निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

दरम्यान, शनिवारी जेव्हा धोनीने लाईव्ह येणार असल्याचे जाहीर केले होते, तेव्हापासून अनेक चाहत्यांनी तर धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीचा अंदाज बांधला होता. मात्र आता या बातमीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. आता महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

धोनीचे करिअर

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याची गणना क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून केली जाते. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी20 विश्वचषक आणि २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. तर २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्या नेतृत्वात जिंकली होती. धोनीने ९० कसोटी सामने खेळताना ४८७६ धावा केल्या आहेत. तर ३५० वनडे सामन्यात १०७७३ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये १६१७ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या