Dinesh Karthik : काय सांगता! धोनीकडून दिनेश कार्तिकचं कौतुक, कारण ऐकून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
ms dhoni & dinesh karthik : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Cricket News) सध्या कॉमेंट्री करत आहे. डीके (dinesh karthik in rcb podcast) आपल्या कॉमेंट्रीमुळे खूप चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धेनीनेही त्याच्या कॉमेंट्रीचे कौतुक केले आहे.
ms dhoni praised dinesh karthik commentary : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने दिनेश कार्तिकच्या कॉमेंट्रीचे कौतुक केले आहे. खुद्द कार्तिकने याचा खुलासा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) च्या पॉडकास्टमध्ये कार्तिकने हा किस्सा सांगितला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
३७ वर्षीय दिनेश कार्तिक सध्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत समालोचन करत आहे. तो आयपीएल (IPL 2023) मध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत कार्तिकने 'RCB Podcaster' वर सांगितले की, धोनीकडून मिळालेल्या कौतुकाच्या प्रत्येक शब्दाने त्याच्यासाठी कॉमेंट्री अधिक खास बनली आहे.
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सांगितले की, 'मला समालोचनाच्या काहीच संधी मिळाल्या आहेत. मला वाटते की खेळाबद्दल बोलण्यात, त्याचे विश्लेषण करण्यात मला खरोखर आनंद मिळत आहे. मला खेळाचे असे वर्णन करायचे आहे की हा खेळ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी काहीतरी अर्थपूर्ण असले पाहिजे".
तसेच, तो पुढे म्हणाला की, 'मला कॉमेंट्रीबाबत मिळालेली सर्वात मोठी प्रशंसा त्या व्यक्तीकडून आली आहे, ज्याचा मी विचारही केला नव्हता. मी धोनीबद्दल बोलतोय. तो (धोनी) मला म्हणाला, 'मला समालोचन खूप आवडले. फार फार चांगले. तु खूप छान करत आहेस'.
याशिवाय कार्तिकने सांगितले, 'मला याचे सुखद आश्चर्य वाटले. मी त्याचे (धोनीचे) आभार मानले. तुला माहित आहे की ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तो खेळावर बारीक नजर ठेवतो. त्यामुळे त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकून खूप आनंद झाला आणि मला याचाही आनंद झाला की त्याने माझ्या समालोचनाचा आनंद घेतला".
दिनेश कार्तिकबद्दल बोलायचे झाले तर तो आता ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.