MS Dhoni Birthday : धोनीनं स्किलच्या जोरावर जग जिंकलं, क्रिकेटच्या मैदानावर बुद्धीबळ खेळून जगाला वेड लावलं
MS Dhoni Birthday : महेंद्रसिंह धोनी ७ जुलै रोजी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. टीम इंडियासाठीच नाही तर IPL मध्येही धोनीने आपल्या कर्णधार पदाचा जलवा दाखवून दिला आहे. धोनीने कर्णधार म्हणून टीम इंडियाला तीन ICC ट्रॉफी तर चेन्नई सुपर किंग्सला पाच IPL ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत.
happy birthday MS Dhoni : टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी (७ जुलै) ४२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नाही. मात्र, त्याची लोकप्रियता ही किंचितही कमी झालेली नाही. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याने नुकत्याच झालेल्या IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.
ट्रेंडिंग न्यूज
२००४ मध्ये जेव्हा एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, तेव्हा अनेकांना असे वाटले होते की, हा खेळाडू जास्त काळ टिकणार नाही. याला अनेक कारणे होती, त्यापैकीच एक म्हणजे, धोनीकडे क्रिकेटमध्ये जे टेक्निक लागते ते त्याच्याकडे नव्हते.
पण अशा परिस्थितीत, धोनीने जगाला वेड लावणाऱ्या स्किल आत्मसात केल्या. याच अफलातून स्किलच्या बळावर त्याने त्या लोकांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवले. २००४ मध्ये पदार्पण करणार्या धोनीने पुढच्या काही वर्षात असा प्रभाव पाडला की, तो अजूनही कायम आहे. तो जेवढी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे, तेवढी वर्षे भारतीय क्रिकेटवर त्याचीच सत्ता कायम राहिली.
धोनीची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते, धोनीने भारतीय संघाला दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे.
विशेष म्हणजे, केवळ टीम इंडियासाठीच नाही तर इंडियन प्रीमियर लीगमध्येही धोनीने आपल्या कर्णधार पदाचा जलवा दाखवून दिला आहे. धोनीच्या नावावर कर्णधार म्हणून ५ ट्रॉफी आहेत, चॅम्पियन्स लीग देखील त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जिंकली होती.
धोनीचे वनडे करिअर-
धोनीने ३५० दिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने १० हजार ७७३ धावा ठोकल्या आहेत. यात १० शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, धोनी यादरम्यान ८२६ चौकार तर २२९ षटकारही ठोकले आहेत. सोबतच विकेटकीपर म्हणून त्याने ३२१ झेल आणि १२३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
धोनीचे टेस्ट क्रिकेट-
धोनी ९० कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्याने ४८७६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. कसोटीत धोनीने ६ शतके तर ३३ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच, विकेटकीपर म्हणून २५६ कॅच आणि ३८ यष्टीचीत केले आहेत.
धोनीचे टी-20 क्रिकेट करिअर-
धोनीने ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १६१७ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ५६ इतकी आहे. या दरम्यान माहीने ११६ चौकार आणि ५२ षटकार ठोकले आहेत. तर विकेटकिपींगमध्ये ५७ झेल आणि ३४ यष्टिचीत केले आहेत.
धोनीचे आयपीएल करिअर
आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत २५० सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २१८ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ५०८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २४ अर्धशतके झळकावली आहेत.