मराठी बातम्या  /  Sports  /  Ms Dhoni Article 370 Kjs Dhillon Drinking Tea With Ms Dhoni On The Day Of Removal Article 370 Jammu And Kashmir

MS Dhoni Article 370 : कलम ३७० हटवलं त्या दिवशी धोनीसोबत चहा पीत होतो, लष्करी अधिकाऱ्याचा खुलासा

MS Dhoni Article 370
MS Dhoni Article 370
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 30, 2023 11:26 AM IST

Inside Story Of Removal of Article 370 in Jammu And Kashmir : लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन (KJS Dhillon) यांनी 'मिशन आर्टिकल ३७०' किती (MS Dhoni Article 370) सावधगिरीने पार पाडण्यात आले, याचा खुलासा केला आहे. कलम ३७० हटवण्याची योजना कशी सुरू होती, हे त्यांनी सांगितले.

ms dhoni and KJS Dhillon Article 370 : ५ ऑगस्ट २०२१ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. मोदी सरकारमधील हा ऐतिहासिक दिवस पार पाडण्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन कुल एमएस धोनीही भारतीय लष्करासोबत जम्मू-काश्मीरमध्ये उपस्थित होता. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी 'मिशन आर्टिकल ३७०' किती सावधगिरीने पार पाडण्यात आले, याचा खुलासा केला आहे. कलम ३७० हटवण्याची योजना कशी सुरू होती, हे त्यांनी सांगितले. तसेच, त्यादरम्यान धोनी आपल्यासोबत होता, याचा खुलासाही केजेएस ढिल्लन यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केजेएस ढिल्लन नेमकं काय म्हणाले?

एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केजेएस ढिल्लन यांनी याबद्दल सांगितले की, कलम ३७० हटवण्याची योजना कॉर्प्स कमांडरच्या ड्रॉईंग रूममध्ये म्हणजेच माझ्या घरामध्ये करण्यात आली होती, जेणेकरून कोणालाही कळू नये. ही गोष्ट फक्त अडीच जणांना माहीत होती. अडीच कारण केवळ दोन जणांनाच संपूर्ण गोष्ट माहीत होती, तर एकाला अर्धीच माहिती होती. या व्यतिरिक्त काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० हटवण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत कोर कमांडरने काय केले पाहिजे की, इतरांना आणि पाकिस्तानला वाटेल की, सर्व काही सामान्य आहे. जर कोर कमांडर आपल्या अधिकार्‍यांशी भेटत असेल, ब्रीफिंगमध्ये असेल, धावा-धाव करत असेल, अथवा सतत फोनवर असेल तर सर्वांना वाटेल की काहीतरी गडबड आहे. पण त्या दिवशी मी एमएस धोनीसोबत दीड तास खोलीत चहा घेतला. यानंतर तो माझ्या घरी जेवणासाठी आला. ही सगळी साम दाम दंड भेद नीती बातमी बाहेर जाऊ नये म्हणून वापरली गेली. फक्त पाकिस्तानच नाही तर त्या परिसंस्थेलाही काय होणार आहे हे कळू दिले नाही. यामुळेच शांतता राखणे शक्य झाले".

धोनी १५ दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता

भारतीय टेरिटोरियल आर्मीने २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीला सन्मान म्हणून लेफ्टनंट कर्नलची मानद रँक दिली होती. जेव्हा कलम ३७० हटवले जात होते, तेव्हा एमएस धोनी जम्मू-काश्मीरमध्ये १५ दिवसांसाठी तैनात होता. त्यावेळी धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्विटरवर फिनिशर धोनी हा ट्रेंडही केला होता. चाहत्यांनी सांगितले की मिस्टर फिनिशरला १५ दिवसांसाठी जम्मू आणि काश्मीरला पाठवण्यात आले आणि कलम ३७० मोठ्या यशाने फिनीश करण्यात आले.

WhatsApp channel