मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Ranchi : सामना न्यूझीलंडने जिंकला, पण रांचीच्या मैदानात फक्त धोनी... धोनीच्या घोषणा

MS Dhoni Ranchi : सामना न्यूझीलंडने जिंकला, पण रांचीच्या मैदानात फक्त धोनी... धोनीच्या घोषणा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 11:09 PM IST

ms dhoni at ranchi stadium india vs new zealand 1st t20 match : न्यूझीलंडने पहिल्या T20 सामन्यात भारताचा २१ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.

ms dhoni at ranchi stadium ins vs nz 1st t20 match
ms dhoni at ranchi stadium ins vs nz 1st t20 match

ms dhoni at ranchi stadium ind vs nz 1st t20 match : पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ २० षटकात ९ बाद १५५ धावाच करू शकला.

दरम्यान, पहिल्या T20 सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. धोनी सामन्यादरम्यान हात दाखवून चाहत्यांना अभिवादन करताना दिसला. यावेळी कॅमेरा धोनीच्या दिशेने जाताच संपूर्ण मैदान धोनी-धोनीच्या घोषणांनी दूमदूमून गेले होते. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी एमएस धोनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पोहोचला होता. त्याला पाहून भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले होते. धोनीने निवृत्ती घेतली असेल पण त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. IPL २०२३ मध्ये धोनी मैदानावर दिसणार आहे.

सामन्यात काय घडलं?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्याकडून डेव्हन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात भारताचा संघ २० षटकात ९ बाद १५५ धावाच करू शकला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून ब्रेसवेल, फर्ग्युसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, जेकब डफी आणि इश सोढी यांना एक विकेट मिळाली.

या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

WhatsApp channel