Delhi HC on Shikhar Dhawan wife Ayesha Mukherjee: भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. २०२१ पासून दोघांमध्ये हे प्रकरण सुरू आहे. तर धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत आहेत. धवन ऑगस्ट 2020 पासून आपला मुलगा जोरावरला भेटलेला नाही. पण आता धवनसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्ली कोर्टाने आयशाला त्यांचा ९ वर्षांच्या मुलगा जोरावरला धवन आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या आयशा तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे. आयेशाने धवनच्या कुटुंबीयांशी मुलाच्या भेटीला घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सांगितले की, शिखर धवनचे कुटुंब ऑगस्ट 2020 पासून मुलाला भेटलेले नाही. एकट्या आईचा मुलावर अधिकार नाही. शिखर धवनने आतापर्यंत एक चांगला पिता असल्याचे सिद्ध केले आहे. मग आयशा मुलाला त्याच्या धवनच्या कुटुंबियांना भेटू का देत नाहीये? शिखर धवन कायमस्वरुपी कस्टडी मागत नाही. त्यांना फक्त आपल्या मुलाला बघायचे आणि भेटायचे आहे. न्यायालयाने आयेशा धवनला स्वत: मुलाला भारतात आणावे किंवा विश्वासू व्यक्तीसोबत जोरावरला धवन कुटुंबाला भेटण्यासाठी पाठवावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
दरम्यान, २८ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुलाचा ताबा धवन कुटुंबीयांकडे सोपवण्यात यावा. जर काही कारणास्तव आयेशासाठी हे शक्य नसेल तिने ७२ तासाच्या आत उत्तर द्यावे. याशिवाय, शिखर धवनच्या मुलाला ऑस्ट्रेलियातून भारतात पाठवण्यासाठी व्हिसा किंवा आवश्यक कागदपत्रांची मंजुरी मिळवण्याची जबाबदारी आयेशावर असेल. २७ जून २०२३ रोजी धवनचा मुलगा भारतात येईल. त्यानंतर त्याला ४ जुलैला ऑस्ट्रेलियाला परत पाठवले जाईल. या प्रवासाचा सर्व खर्च शिखर धवन उचलणार आहे, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.