Morocco to cull 3 million stray dogs : फिफा वर्ल्डकप २०३० चे यजमानपद मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल भुषवणार आहेत. या स्पर्धेपूर्वी मोरोक्को सरकारने एक मोठी आणि विचित्र घोषणा केली आहे. या निर्णयावर आता जगभरातून टीका होत आहे. खरं तर, मोरोक्कोने फिफा विश्वचषकाआधी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची योजना जाहीर केली आहे.
पण मोरोक्कोच्या या योजनेवर आता जगभरातील प्राणी कल्याण संस्था आणि कार्यकर्त्यांनी टीका केली आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, मोरोक्कन सरकार देशातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी अशा अमानवी आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करण्याचा विचार करत आहेत. या योजनेंतर्गत, कुत्र्यांना सर्वात धोकादायक स्ट्रायक्नाईन विष देणे, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना गोळ्या घालणे किंवा फावडे मारून ठार करण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल ॲनिमल वेल्फेअर अँड प्रोटेक्शन कोलिशनने मोरोक्कोच्या या योजनेबाबत जगाला इशारा दिला आहे की, या योजनेअंतर्गत सुमारे ३० लाख कुत्रे मारले जाऊ शकतात.
प्रसिद्ध प्राइमेटोलॉजिस्ट आणि प्राणी हक्क वकिल जेन गुडॉल यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे आणि फिफाला पत्र लिहून या हत्या थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
फिफाला लिहिलेल्या पत्रात जेन गुडॉल यांनी या योजनेअंतर्गत वापरल्या जाणाऱ्या क्रूर आणि अमानवीय पद्धतींचा तीव्र शब्दात निषेध केला आणि कुत्र्यांची हत्या सुरू राहिल्यास मोरोक्कोमध्ये होणारी फिफा स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या