मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohsin Khan : मोहसीन खानची रडवणारी कमबॅक स्टोरी, थोडा उशीर झाला असता तर एक हात कापावा लागला असता!
mohsin khan lsg vs mi
mohsin khan lsg vs mi

Mohsin Khan : मोहसीन खानची रडवणारी कमबॅक स्टोरी, थोडा उशीर झाला असता तर एक हात कापावा लागला असता!

17 May 2023, 16:06 ISTRohit Bibhishan Jetnavare

Mohsin Khan ipl 2023 comeback story : लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅच विनिंग शेवटचे षटक टाकले. यानंतर तो चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Mohsin Khan inspirational comeback story : आयपीएल 2023 मध्ये एकाहून एक कमबॅक स्टोरीज पाहायला मिळत आहे. मोहित शर्मा असो किंवा पियुष चावला, वय फक्त एक आकडा असल्याचे सिद्ध करत त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली. ते त्यांच्या संघासाठी मॅचविनर ठरले आहेत. त्याचप्रमाणे लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने (mohsin khan lsg vs mi) मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या षटकात ११ धावांचा यशस्वी बचाव केला. यानंतर मोहसीन चांगलाच चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोहसीन खानने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (mohsin khan vs mumbai indians) सामन्यात ३ षटकांत २६ धावा जेत १ विकेट घेतला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लखनौ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मोहसीन खानची कमबॅक स्टोरी अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

उत्तर प्रदेशचा २४ वर्षीय मोहसीन खानवर ऑक्टोबर २०२२ मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या मोहसीन खानच्या डाव्या हाताच्या खांद्यामध्ये रक्ताची गुठळी तयार झाली होती, ती काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

मोहसीनने सांगितला शस्त्रक्रियेचा भयानक अनुभव

शस्त्रक्रियेमुळे मोहसीन बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. या मोसमात त्याने तीन सामने खेळले असून दोन विकेट घेतल्या आहेत. मोहसीनने सांगितले, “एका टप्प्यावर मी क्रिकेट खेळण्याची सर्व आशा सोडून दिली होती. कारण मी माझा हात पूर्णपणे उघडू शकत नव्हतो. फिजिओने माझ्यासोबत खूप मेहनत घेतली. तो काळ आठवताना मला भीती वाटते. मला सांगण्यात आले होते की जर आता एक महिनाही उशीर झाला तर हात कापावा लागेल".

लखनौ फ्रँचायझीचे आभार

मोहसीन पुढे म्हणाला, “मला ज्या दुखापतींना सामोरे जावे लागले त्या दुखापतीला इतर कोणत्याही क्रिकेटपटूला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रार्थना करा. ते एखाद्या आजारासारखे होते. माझ्या शिरा पूर्णपणे बंद झाल्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर मला खूप संघर्ष करावा लागला. माझ्यासाठी तो कठीण काळ होता. मला लखनौ फ्रँचायझीकडून पूर्ण पाठिंबा मिळाला, यासाठी मी कृतज्ञ आहे.