मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hasin Jahan: देशाचं नाव बदला, मोहम्मद शमीच्या बायकोचं मोदी-शहा यांना आवाहन

Hasin Jahan: देशाचं नाव बदला, मोहम्मद शमीच्या बायकोचं मोदी-शहा यांना आवाहन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 15, 2022 01:17 PM IST

hasin jahan appeal to PM Modi: हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते.

Hasin Jahan
Hasin Jahan

hasin jahan appeal to PM Modi: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सतत चर्चेत असते. तिने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. शमीपासून विभक्त झाल्यानंतर हसीन जहाँ सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. आता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहाँने इंस्टाग्राम पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींना हे खास आवाहन केले आहे.

हसीन जहाँने तिच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. हसीनने इंडिया या नावावर आक्षेप दर्शविला  आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत हसीन जहाँने लिहिले की, "आमचा देश, आमचा सम्मान आहे. मला भारत आवडतो. आपल्या देशाचे नाव फक्त भारत किंवा हिंदुस्थान असावे."

हसीन जहाँने पुढे लिहिले की, "माननीय पंतप्रधानांसह मी माननीय गृहमंत्र्यांना भारताचे नाव बदलण्याची विनंती करते, जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणेल, इंडिया नाही."

यासोबत हसीन जहाँने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये तीन मुली पांढऱ्या ड्रेसमध्ये डान्स करत आहेत. या मुलींच्य दुपट्ट्याचा रंग भगवा, पांढरा आणि हिरवा आहे, जो देशाचा झेंड्या रंग आहे. तसेच व्हिडिओमध्ये 'देश रंगीला' हे गाणे वाजते आहे.

हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले. मात्र बीसीसीआयने तपासात शमीला निर्दोष ठरवले असून तो देशासाठी खेळत आहे.

WhatsApp channel