भारताच्या मीराबाई चानूकडून बुधवारी (७ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु मीराबाईने भारतीय चाहत्यांना निराश केले. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात ११४ किलो वजन उचलता आले नाही आणि त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
आज गुरुवारी (८ ऑगस्ट) मीराबाईचा वाढदिवस (३०) आहे, वाढदिवसादिवशी तिला इतिहास रचण्याची संधी होती. या इव्हेंटनंतर मीराबाईनेही सांगितले की तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे सर्व तिच्यासाठी खूप कठीण होते.
मीराबाई चानू म्हणाली, "की आजच्या कामगिरीने मी खूप खूश आहे, सर्वांना माहित आहे की मला खूप दुखापतींचा सामना करावा लागला आहे, रिओ (२०१६ ऑलिम्पिक) मध्ये माझ्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत आहे. तिथे माझे पदक हुकले होते. असे प्रत्येक खेळाडूसोबत घडते.
मीराबाई पुढे म्हणाली, 'त्यानंतर मी जगज्जेता बनले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी भारतासाठी रौप्यपदक जिंकले. यावेळीही मी प्रयत्न केला.
यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत माझी काय अवस्था झाली होती, हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर मी ४-५ महिन्यांसाठी रिहॅबसाठी गेले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खूप कमी वेळ होता, मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही".
पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीवर मीराबाई चानू म्हणाली, “आज माझे नशीबही खराब होते आणि महिला समस्या (पीरियड) देखील होती. आज माझ्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता. जेव्हा मी याआधीच्या ऑलिम्पिकमध्ये खेळत होते, तेव्हा माझ्या पिरियडचा दुसरा दिवस होता. पण मी माझ्या परीने प्रयत्न केले. यावेळी पदक देऊ न शकल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. ते माझ्या नशिबात नव्हते”.
मीराबाई आज (८ ऑगस्ट) ३० वर्षांची झाली आहे. अशा स्थितीत मीराबाईला त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतिहास रचण्याची संधी होती, पण ती हुकली. ४९ किलो वजनी गटात भाग घेणाऱ्या मीराबाईने स्नॅच फेरीत उत्कृष्ट प्रयत्न केले आणि या फेरीनंतर ती तिसरी राहिली. या फेरीत तिने ८८ किलो वजन उचलले होते. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण इथे तिने निराशा केली.
मीराबाई चानूने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो असे एकूण १९९ किलो वजन उचलले. यामुळे तिचे पदक अवघ्या एक किलोने हुकले.
चीनच्या हॉउ झिहुईने क्लीन अँड जर्कमध्ये ऑलिम्पिक विक्रमासह पहिले स्थान मिळविले. तिने एकूण २०६ किलो वजन उचलले (स्नॅच ८९, क्लीन आणि जर्क ११७). रोमानियाची व्हॅलेंटिना कॅम्बेई २०६ (९३ आणि ११२) किलो वजनासह रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली आणि थायलंडच्या सुरोदचना खांबोने २०० (८८ आणि ११२) किलो वजनासह कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.