Mirabai Chanu : विनेश फोगाट नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का! मीराबाई चानूचं पदकाचं स्वप्न १ किलोनं भंगलं-mirabai chanu missed to win medal in paris olympic weightlifting big setback for india paris olympics ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mirabai Chanu : विनेश फोगाट नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का! मीराबाई चानूचं पदकाचं स्वप्न १ किलोनं भंगलं

Mirabai Chanu : विनेश फोगाट नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का! मीराबाई चानूचं पदकाचं स्वप्न १ किलोनं भंगलं

Aug 08, 2024 08:39 AM IST

mirabai chanu match olympics 2024 : मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, तीच पदकाचं स्वप्न फक्त १ किलोने भंगलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं देशासाठी रौप्य पदक जिंकलं होतं.

विनेश फोगाट नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का! मीराबाई चानूचं पदकाचं स्वप्न १ किलोनं भंगलं
विनेश फोगाट नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का! मीराबाई चानूचं पदकाचं स्वप्न १ किलोनं भंगलं

mirabai chanu match olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये बुधवारी भारताला दोन मोठे धक्के बसले. एकीकडे स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट वजनामुळे अपात्र ठरली तर त्याचवेळी वेटलिफ्टिंगमध्ये सायखो मीराबाई चानूचेही पदक देखील हुकले. तिने १९९ किलो वजन उचलून ती चौथ्या स्थानावर राहिली तर चीनच्या खेळाडूनं सुवर्ण पदक पटकावले. तर रोमानियाच्या खेळाडूनं रौप्य आणि थायलँडच्या खेळाडूने कांस्य पदक मिळवल्याने वेटलिफ्टिंगमध्ये भारताची पदकाची संधी हुकली आहे. दरम्यान, आज गुरुवारी भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीची पुनरावृत्ती करणार का?  या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

मीराबाई चानूनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये २०२ किलोचे वजन उचलून रौप्य पदक मिळवले होते. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलले होते. मीराबाई चानूने तिची कामगिरी चांगली ठेवत पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, तीच व देशाच पदकाचं स्वप्न केवळ एका किलोने भंगलं.

तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या मीराबाई चानूने ४९ किलो गटात चौथे स्थान पटकावले. तिने एकूण १९९ किलो वजन उचलले, ज्यामध्ये ८८ किलो स्नॅच आणि १११ किलो क्लीन अँड जर्कचा समावेश होता. तर चीनच्या हौ शिहुईने २०६ किलो वजन उचलून पहिला क्रमांक पटकावला. रोमानियाची मिहाएला कॅम्बी २०५ किलो वजन उचलून दुसऱ्या तर थायलंडची सुरोदचना खांबाओ २०० किलो वजन उचलून तिसऱ्या स्थानावर राहत कांस्य पदक पटकावले.

भारताने जिंकली केवळ तीन पदकं

भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत फक्त तीन पदकं जिंकली आहेत. तर अमेरिका पदक तालिकेत पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारातासाठी नेमबाजीत मनू भाकरनं १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. तर मिश्र दुहेरीत स्पर्धेत मनू भाकर व सरबज्योत सिंग या दोघांनी कांस्य पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं देखील कांस्य पदक मिळवलं आहे.

नीरज चोप्रा आज रचणार इतिहास

भालाफेक स्पर्धेत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राणे सुवर्णपदक जिंकले होते. हे केवळ एक सुवर्ण पदक देशाला मिळाले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला असून त्याचा आज सामना होणार आहे. या सामन्यात त्याच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत.

विभाग