असं म्हणतात की शेर कभी बुढा नही होता... हीच ओळ खरी करून दाखवण्यासाठी महान बॉक्सर माईक टायसन रिंगमध्ये उतरला होता. वयाच्या ५८ व्या वर्षी तो २७ वर्षीय बॉक्सर जॅक पॉलसोबत लढण्यास तयार झाला, परंतु या लढतीपूर्वी टायसनने एक भलीमोठी चूक केली, या चुकीची कोणालाही अपेक्षा नव्हती.
लढतीपूर्वी समोरासमोर कॅमेऱ्यांसमोर आलेल्या दोन बॉक्सर्समध्ये वाद झाला तेव्हा पॉलने त्यांची छेड काढली. यावर माईक टायसनने त्याला उघडपणे थप्पड मारली.
माईक टायसन हा जगातील सर्वात महान बॉक्सरपैकी एक आहे. टायसन आजकाल यूट्यूबर जेक पॉलसोबतच्या बॉक्सिंग लढतीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. ही लढत १६ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे.
परंतु या लढतीपूर्वीच गुरुवारी दोघेजण कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यासाठी आमनेसामने आले होते. याच दरम्यान, माईक टायसन याने जेक पॉलच्या थोबाडीत मारली.
माइक टायसन आणि जेक पॉल स्वतःचे वजन करून समोरासमोर उभे राहिले. त्यानंतर टायसनने उजवा हात वर करून जेक पॉलच्या गालावर चापट मारली. ही घटना घडताच सुरक्षारक्षकांनी तात्काळ परिस्थिती सांभाळत दोघांना वेगळे करून स्टेजवरून खाली उतरवले. टायसन फक्त अंडरवेअरमध्ये दिसला आणि स्टेज सोडताना तो म्हणाला, "गोष्टी बनवण्याची वेळ संपली आहे."
वास्तविक, या लढतीपूर्वी जेव्हा दोघे आमनेसामने आले तेव्हा पॉलने टायसनची छेड काढली, ज्यामुळे टायसनला राग आला आणि त्याने लगेच त्याला थप्पड मारली. तथापि, पॉल देखील दररोज वादात राहतो.
दुसरीकडे, थप्पड मारल्यानंतरही जेक पॉल स्टेजवर उभा राहिला आणि त्याने असा दावा केला की थप्पडचा आपल्याला काहीही परिणाम झाला नाही, यामुळे उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली. स्टेज सोडताना, पॉलने शपथ घेतली की तो माईक टायसनला रिंगमध्ये नॉकआउट करणार आहे आणि म्हणाला, “ टायसनने आता हे जग सोडले पाहिजे.”
दरम्यान, जेक पॉल आणि माईक टायसन यांच्या लढतीत प्रत्येकी दोन मिनिटांच्या ८ फेऱ्या असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माइक टायसनला या लढतीसाठी २० दशलक्ष डॉलर्सची रक्कम दिली जात आहे. ही रक्कम भारतीय चलनात सुमारे १६८ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे.
जगभरातील व्यावसायिक बॉक्सिंग चाहत्यांसाठीही ही लढत खास आहे कारण माइक टायसन १९ वर्षांनंतर रिंगमध्ये उतरणार आहे. त्याने २००५ साली बॉक्सिंग करिअरला अलविदा केला.