मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Michael Bracewell Century : ब्रेसवेवलंच ५७ चेंडूत शतक, भारत-न्यूझीलंड सामना रोमहर्षक स्थितीत
Michael Bracewell Century
Michael Bracewell Century

Michael Bracewell Century : ब्रेसवेवलंच ५७ चेंडूत शतक, भारत-न्यूझीलंड सामना रोमहर्षक स्थितीत

18 January 2023, 21:08 ISTRohit Bibhishan Jetnavare

Michael Bracewell Century : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावा केल्या आहेत. भारताकडून शुभमन गिलने द्विशतकी खेळी करताना २०८ धावा ठोकल्या.

India Vs New Zealand 1st ODI Match : हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३५० धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने ५० षटकांत आठ विकेट गमावत ३४९ धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक २०८ धावांची खेळी खेळली.

ट्रेंडिंग न्यूज

३५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मिचेल ब्रेसवेलने वादळी शतक ठोकले आहे. त्याने अवघ्या ५७ चेंडूत शतक ठोकले आहे. ब्रेसवेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला आहे. तो आतापर्यंत ५७ चेंडूत १०२ धावा करून खेळत आहे.

हे वृत्त लिहिपर्यंत न्यूझीलंडच्या ४२.३ षटकात ६ बाद २६८ धावा झाल्या आहेत. त्यांना विजयासाठी आणखी ४५ चेंडूत ८२ धावांची आवश्यकता आहे. ब्रेसवेल आणि सॅंटनर (३८) धावावंर खेळत आहेत. दोघांमध्ये ७व्या विकेटसाठी ८६ चेंडूत १४५ धावांची भागिदारी झाली आहे.

न्यूझीलंडसाठी वनडेत सर्वात जलद शतक करणारे फलंदाज

फलंदाज विरुद्ध मैदानवर्षकिती चेंडूत
कोरी अँडरसनवेस्ट इंडिजक्विन्सटाउन२०१४३६
जेसी रायडरवेस्ट इंडिजक्विन्सटाउन२०१४४६ 
मिचेल ब्रेसवेलभारतहैदराबाद२०२३५७
क्रेग मॅकमिलनऑस्ट्रेलियाहॅमिल्टन२००७६७

तत्पूर्वी, ३५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. २८ धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. डेव्हन कॉनवे १६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. त्यानंतर त्यांचे ठराविक अंतराने विकेट पडले.

न्यूझीलंडचा सहावा विकेट २९व्या षटकात पडला. कर्णधार टॉम लॅथम ४६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने तंबूत पाठवले. लॅथमने तीन चौकार मारले. यानंतर सॅंटनर आणि ब्रेसवेल यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांनी शतकी भागिदारी रचली.