मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs UP Highlights : मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव

MI vs UP Highlights : मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2023 07:04 PM IST

MI vs UP Live Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

MI vs UP Live Score
MI vs UP Live Score

WPL Cricket Score, UPW vs MI Eliminator Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ १७.४ षटकांत ११० धावांवर गारद झाला.

MI vs UP WPL 2023 Score updates

मुंबईचा शानदार विजय

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. मुंबईने हा सामना ७२ धावांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये मुंबईचा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार. हा सामना २६ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुणतालिकेत यूपीने तिसरे स्थान मिळवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांना पुढे प्रगती करता आली नाही.

नताली स्कायव्हर ब्रंटच्या नाबाद ७२ आणि इस्सी वोंगच्या हॅट्ट्रिकमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला. इस्‍सी वाँगने चार षटकांत १५ धावा देत ४ बळी घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

यूपीकडून किरण नवगिरे एकाकी लढत दिली. तिने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. तिला दुसऱ्या टोकाकडूनही साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा १६ , ग्रेस हॅरिस १४ आणि अॅलिसा हिली ११ धावा करून बाद झाल्या. यूपीच्या ११ फलंदाजांपैकी फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मुंबईकडून इस्‍सी वोंग व्यतिरिक्त सायका इशाकने दोन बळी घेतले. नताली सीव्हर, हेली मॅथ्यूज आणि जय कलिता यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

MI vs UP Live Score : यूपीला बसला आठवा धक्का 

यूपी वॉरियर्सचा संघ मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात पराभवाच्या मार्गावर आहे. १४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हिली मॅथ्यूजने त्यांना आठवा धक्का दिला. तिने दीप्ती शर्माला कलिताकरवी झेलबाद केले. दीप्तीने २० चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या.

MI vs UP Live Score : इस्सी वोंगने इतिहास रचला

इस्सी वोंगने महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला. युपी वॉरियर्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात तिने हॅटट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारी ती या स्पर्धेतील पहिली गोलंदाज ठरली आहे. वोंगने १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून मुंबईला मोठे यश मिळवून दिले. तिने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. यादरम्यान तिने ४ चौकार आणि तीन षटकार मारले. नवागिरे नताली सिव्हरच्या हाती झेलबाद झाली. ती बाद झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर इस्सी वँगने सिमरन शेखला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला क्लीन बोल्ड करून तिने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

MI vs UP Live Score : ग्रेस हॅरिसही बाद

महत्त्वाच्या सामन्यात ग्रेस हॅरिसची बॅट चालली नाही. १२ चेंडूत १४ धावा करून ती बाद झाली. ती नताली सीव्हर ब्रंटच्या चेंडूवर इस्सी वोंगकरवी झेलबाद झाली. यूपीने आठ षटकांत चार बाद ५७ धावा केल्या आहेत. दीप्ती शर्मा आणि किरण नवगिरे क्रीजवर आहेत.

MI vs UP Live Score : ताहलिया मॅकग्रा धावyeo

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला तिसरे यश मिळाले. एकेरी घेण्याच्या प्रयत्नात ताहलिया मॅकग्रा धावचीत झाली. अमनजोत कौरच्या थ्रोवर मॅकग्रा धावबाद झालr. ती बाद झाल्यानंतर ग्रेस हॅरिस क्रीजवर आली आहे.

MI vs UP Live Score : यूपी वॉरियर्सला सर्वात मोठा धक्का

इस्सी वोंगने यूपी वॉरियर्सला सर्वात मोठा धक्का दिला. तिने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीला बाद केले. हिलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. तर दुसऱ्या चेंडूवर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिचा झेल घेतला. अॅलिसा बाद झाल्यानंतर फॉर्ममध्ये असलेली खेळाडू ताहलिया मॅकग्रा क्रीझवर आली.

MI vs UP Live Score : मुंबई इंडियन्सच्या १८२ धावा

मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर १८३ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या आहे. त्यांच्यासाठी नताली सीव्हर ब्रंटने शानदार खेळी केली. तिने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. यादरम्यान तिच्या बॅटमधून ९ चौकार आणि २  षटकार निघाले. 

अमेलिया केरने १९ चेंडूत २९, हीली मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ आणि यास्तिका भाटियाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १५ चेंडूत १४ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने दोन बळी घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

MI vs UP Live Score : १६ षटकांत मुंबईची धावसंख्या १२८/३

मुंबई इंडियन्सने १६ षटकांत ३ गडी गमावून १२८ धावा केल्या आहेत. नताली सिव्हर ब्रंटने शानदार अर्धशतक झळकावले आहे. २७ चेंडूत ५१ धावा करून खेळत आहे. अमेलिया केरने १० चेंडूत नऊ धावा केल्या आहेत.

MI vs UP Live Score : मुंबईला तिसरा धक्का

सोफी एक्लेस्टोनने मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला. तिने १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरला बाद केले. हरमनप्रीतने १५ चेंडूत १४ धावा केल्या. तिने नताली सीव्हर ब्रंटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली.

MI vs UP Live Score : यूपीला मिळाले पहिले यश 

पाचव्या षटकात यूपी वॉरियर्सला पहिले यश मिळाले. अंजली सरवणीने यस्तिका भाटियाला किरण नवगिरेकडे झेलबाद केले. यास्तिकाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले. यास्तिका बाद झाल्यानंतर नताली स्कायव्हर ब्रंट क्रीजवर आली. मुंबईने पाच षटकांत एका विकेटवर ३७ धावा केल्या आहेत.

MI vs UP Live Score : दोन्ही संघ 

मुंबई इंडियन्स :  हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

यूपी वॉरियर्स : अॅलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, पार्श्वी चोप्रा, एस यशश्री.

MI vs UP Live Score : मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करेल

यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करेल. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघात एकही बदल केलेला नाही. यूपी वॉरियर्सच्या संघात ग्रेस हॅरिसचे पुनरागमन झाले आहे. शबनम इस्माईलला वगळण्यात आले आहे.

 

WhatsApp channel