IPL Live Cricket Score, MI vs SRH Indian Premier League 2023 : IPL 2023 च्या ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचबरोबर मुंबईच्या विजयासह राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि आरसीबी यांच्यात चुरस आहे.
दरम्यान, या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता . प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २०० धावा केल्या आणि मुंबईने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.
आयपीएल 2023 च्या ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर २१ मे (रविवार) रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १८ षटकांत पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो कॅमेरून ग्रीन ठरला, ज्याने नाबाद १०० धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकातच इशान किशनची विकेट गमावली. इशान (१४ धावा) भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूककरवी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी १२८ धावांची शानदार शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. रोहित शर्माने ३७ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा केल्या.
येथून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद ५३ धावांच्या भागीदारीने मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने १६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. ग्रीनने केवळ ४७ चेंडूत १०० धावा केल्या, ज्यात ८ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. ग्रीनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली, आयपीएलमध्ये पदार्पण डाव खेळण्यासाठी उतरलेल्या वीव्रांत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावांची भागीदारी केली. विव्रतने ४७ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६९ धावा केल्या. त्याचवेळी मयंक अग्रवालने ४६ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. यादरम्यान मयंकने आठ चौकार आणि चार षटकार मारले.
विव्रंत शर्मा बाद झाल्यानंतर सनरायझर्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, त्यामुळे त्यांना पाच विकेट्सवर २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईतर्फे आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करताना ४ विकेट घेतल्या. त्याच वेळी ख्रिस जॉर्डनला एक विकेट मिळाला.
१४८ धावांवर मुंबई इंडियन्सची दुसरी विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा ३७ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. मयंक डागरच्या चेंडूवर नितीश रेड्डीने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
रोहित शर्माने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे. रोहितच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ या सामन्यात खूप पुढे असून सहज विजय मिळवू शकतो. मात्र, हा सामना जिंकूनही मुंबईला आरसीबी संघ पुढील सामन्यात हरावा, अशी प्रार्थना करावी लागेल.
कॅमेरून ग्रीनने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे मुंबईच्या धावसंख्येने एका विकेटवर १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईचा संघ हा सामना जिंकण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.
रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. ग्रीन वेगवान वेगाने धावा करत आहे. त्याचवेळी रोहित एका टोकाला सावधपणे खेळत आहे. ग्रीनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सात षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ७३ अशी आहे.
२० धावांच्या स्कोअरवर मुंबईची पहिली विकेट पडली. इशान किशन १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला हॅरी ब्रूककरवी झेलबाद केले. इशानने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. आता कॅमेरून ग्रीन रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे. तीन षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर २४ धावा आहे.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या. हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ८३ धावा केल्या. त्याचवेळी विव्रंत शर्माने ६९ धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली.
१७४ धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची दुसरी विकेट पडली. मयंक अग्रवाल ४६ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. आकाश मधवालच्या चेंडूवर ईशान किशनने त्याचा झेल टिपला. मयंकने आपल्या खेळीत आठ चौकार आणि ४ षटकार मारले. ग्लेन फिलिप्स आता हेनरिक क्लासेनसह क्रीजवर आहे.
१४० धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट पडली. विव्रत शर्मा ४७ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. आकाश मधवालने त्याला रमणदीप सिंगकरवी झेलबाद केले. आता हेन्रिक क्लासेन मयंक अग्रवालसोबत क्रीजवर आहे. १५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या एका विकेटवर १५७ आहे.
मयंक अग्रवालने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे. मयंकचे या मोसमातील हे पहिले अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे हैदराबादची धावसंख्या १३ षटकांनंतर बिनबाद १३० धावा झाली आहे.
पाच षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत. सध्या मयंक अग्रवाल ११ चेंडूत २० धावा करून क्रीजवर आहे आणि विवंत शर्मा १९ चेंडूत १८ धावा करुन खेळत आहे. मयंक आणि विव्रत दोघेही सावधपणे फलंदाजी करत आहेत.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.
सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, उमरान मलिक, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या करा किंवा मरोच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.