
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आपल्या दमदार खेळामुळे त्याने अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक-२०२२ मध्ये चॅम्पियन बनवले आहे. जगभरात मेस्सीचे करोडो चाहते आहेत, जे त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
मेस्सीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. पण वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर मेस्सीने एक अगळा-वेगळा विक्रम केला आहे. हा रेकॉर्ड नेमका काय हे ऐकल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. वास्तविक, मेस्सीने सोशल मीडियावरील लाइक्सच्या बाबतीत एका 'अंड्या'ला मागे टाकले आहे.
मेस्सीच्या पोस्टला ६ कोटींहून अधिक लाईक्स
म्हणजेच आता मेस्सीने इन्स्टाग्रामही आपली हवा केली आहे. खरंतर, वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर लिओनेल मेस्सीने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर आतापर्यंत (२० डिसेंबर) ६ कोटी ८३ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. अशा प्रकारे मेस्सीने इंस्टाग्रामवर एवढ्या प्रचंड लाईक्स एक नवा विक्रम केला आहे.
मेस्सीने अंड्याच्या पोस्टचा रेकॉर्ड मोडला
मेस्सीची ही पोस्ट आतापर्यंत जगातील सर्वाधिक लाईक केलेली पोस्ट ठरली आहे. याबाबतीत त्याने अंडी असलेल्या पोस्टला मागे टाकले आहे. ४ जानेवारी २०१९ रोजी वर्ल्ड 'रेकॉर्ड एग' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात फक्त एका अंड्याचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर आतापर्यंत ५ कोटी ६१ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. मेस्सीच्या पोस्टने अंड्याच्या पोस्टचा विक्रम मोडला आहे.
मेस्सीने वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबरला ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टने २४ तासांपेक्षा कमी कालावधीत हा विक्रम केला आहे. मेस्सीने त्याच्या पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो वर्ल्ड कप ट्रॉफी उचलताना, त्याचे चुंबन घेताना आणि सहकारी खेळाडूंसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
इंस्टाग्रामवर मेस्सीला सध्या ४०५ मिलियन्स म्हणजेच ४० कोटी ५ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या नंबरवर ख्रिस्टियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोला ५१९ मिलियन्स लोक इन्स्टग्रामवर फॉलो करतात.
संबंधित बातम्या
