मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO : पंचांच्या निर्णयावर मॅथ्यू वेड संतापला.. हेल्मेट-पॅड फेकले, बॅटही आपटली

VIDEO : पंचांच्या निर्णयावर मॅथ्यू वेड संतापला.. हेल्मेट-पॅड फेकले, बॅटही आपटली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 19, 2022 11:13 PM IST

बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मॅथ्यू वेडने आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून दिले. तसेच त्याने खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली. याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंचांच्या निर्णयावर मॅथ्यू वेड संतापला
पंचांच्या निर्णयावर मॅथ्यू वेड संतापला

आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत अनेक सामन्यात सदोष पंचगिरी दिसून आली आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका अनेक संघाना बसला आहे. मात्र दोन-तीन वेळा असेही दिसून आले की, डीआरएस (डिसिजन रिव्यू सिस्टम)ने सुद्धा खेळाडूंना निराश केले आहे. मुंबई-चेन्नई सामन्यात वीज नसल्याने डीआरएस उपलब्ध नव्हता, एकदा असे दिसून आले कू चेंडूचा बॅटला स्पर्श झाला नाही मात्र अल्ट्राएज मध्ये हालचाल दिसून आली. त्याचबरोबर असेही दिसून आले की, चेंडू बॅटला चाटून गेला मात्र अल्ट्राएजमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६७ वी लढतआज बंगळूरू व गुजरातमध्ये होत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी बंगळुरुला विजय अनिवार्य आहे. दरम्यान गुजरात संघाचा फलंदाज मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर चांगलाच चिडल्याचे दिसले. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून तसेच बॅट आदळून आपला राग व्यक्त केलाय.

गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर १६ धावांवर असताना तो पायचित झाला. बंगळुरुच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर त्याला पंचाने बाद दिले. त्यानंतर लगेच आक्षेप घेत मॅथ्यू वेडने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो पायचित झाल्याचे स्पष्ट झाले.

पंचाच्या या निर्णयावर मॅथ्यू वेड असमाधानी दिसला. आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मत व्यक्त करत मॅथ्यूने मैदानावरच रोष व्यक्त केला. विराट कोहलीने त्याची समजूत काढली. मात्र ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मॅथ्यू वेडने आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून दिले. तसेच त्याने खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली. याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

WhatsApp channel

विभाग