मराठी बातम्या  /  क्रीडा  /  विनोद कांबळीच्या मदतीला धावला मराठी उद्योगपती! दिली मोठ्या पगाराची ऑफर
Vinod Kambli
Vinod Kambli

विनोद कांबळीच्या मदतीला धावला मराठी उद्योगपती! दिली मोठ्या पगाराची ऑफर

19 August 2022, 11:31 ISTRohit Bibhishan Jetnavare

Vinod Kambli: अहमदनगरच्या सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी याला मोठी ऑफर दिली आहे. थोरात यांनी मुंबईस्थित सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर कांबळीला दिली आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्याने आपली व्यथा माध्यमांपुढेदेखील मांडली होती. यामुळे कांबळी मागील दोन दिवसांपासून सतत चर्चेत होता. यानंतर अनेकांनी त्याच्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त केली होती. मात्र, आता एक मराठी उद्योजक विनोद कांबळीच्या मदतीला धावला आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

अहमदनगरच्या सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी याला मोठी ऑफर दिली आहे. थोरात यांनी मुंबईस्थित सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर कांबळीला दिली आहे. तसेच, ते लवकरच विनोद कांबळे याची भेट घेणार आहेत, अशी माहिती स्व:ता थोरात यांनीच दिली आहे.

विनोद कांबळीयाविषयी बोलताना संदीप थोरात काय म्हणाले?

“महाराष्ट्रात इतके चांगले व्यक्ती असताना विनोद कांबळीसारख्या व्यक्तीवर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे. त्याने क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे केले होते. मात्र, आज उदरनिर्वाहासाठी त्याला अशी याचना करावी लागते हे आपले अपयश आहे.”

दरम्यान, कांबळी २०१९ मध्ये मुंबई टी२० लीगमध्ये अखेरच्या वेळी प्रशिक्षक म्हणून दिसला होता. त्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरच्या मिडलसेक्स क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून काही काळ काम केले होते.

आर्थिक परिस्थितीबाबत कांबळी काय म्हणाला होता

मिड डे या वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाला होता की, "मी एक निवृत्त क्रिकेटपटू असून आता पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. या पेन्शनमधूच माझ्या कुटुंबाचा खर्च भागतो. मला नोकरीची गरज आहे. सचिन तेंडुलकरा याची माहिती आहे, पण मी त्याच्याकडून अजून मदत घेऊ शकत नाही कारण यापूर्वीच त्याने माझी खूप मदत केली आहे. तसेच मुंबईने अमोल मजुमदार याला मुख्य प्रशिक्षक म्हणून संघी दिली आहे. त्यांना माझी गरज असल्यास मी उपलब्ध आहे. मी मुंबईसाठी खेळलो आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावे असं मला वाटते."