नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले, तर नेमबाज मनू भाकरने २ कांस्यपदके जिंकली. नीरजने भालाफेकमध्ये पदक जिंकले होते. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिला एकेरी आणि सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले.
यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यामध्ये दोघे एकमेकांशी बोलताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध अफवा उठवल्या.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शूटिंग क्वीन मुन भाकर आणि नीरज चोप्रा एकमेकांना बोलताना लाजत होते. हाच धागा पकडत चाहत्यांनी विविध प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, नीरज चोप्राच्या आईने याआधीच सांगितले होते की, तो त्याच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करणार आहे.
दरम्यान, हे प्रकरण इथेच संपले नाही. नीरज आणि मुनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा काहीतरी बोलताना दिसत होते.
या व्हिडिओमध्ये सुमेधा भाकर नीरजचा हात डोक्यावर ठेवताना काहीतरी बोलताना दिसल्या. मनूची आई आणि नीरज चोप्रा यांचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मनू आणि नीरजच्या लग्नाची अफवा उठवली. चाहते सोशल मीडियावर दावा करू लागले की मनूची आई तिच्या मुलीच्या आणि नीरजच्या लग्नाची बोलणी करत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर मनू भाकरच्या वडिलांनी सर्व काही स्पष्ट केले आहे. मनू भाकरच्या वडिलांनी सांगितले की, "मनु भाकर अजूनही खूप लहान आहे. तिचे लग्नाचे वय नाही." याशिवाय सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा यांच्यातील संभाषणावर मनू भाकरचे वडील म्हणाले की, मनूची आई नीरज चोप्राला आपल्या मुलाप्रमाणे मानते.