भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ही पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील तिच्या ऐतिहासिक यशाचा आनंद घेत आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शाळकरी मुलांसोबत 'काला चष्मा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
खरं तर, वेलमल नेक्सस ग्रुपने मनू भाकर हिच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये २ पदके जिंकणाऱ्या या २२ वर्षीय नेमबाजानेही आपल्या डान्स मूव्हने सर्वांची मने जिंकली.
सोशल मीडियावर या डान्सचा व्हिडीओ येताच लोकांनी तो खूप शेअर करायला सुरुवात केली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनू तिच्या जवळ डान्स करणाऱ्या मुलीच्या मूव्ह पाहून चकित होते. त्यानंतर ती स्वतः तिच्या सहकारी मुलींसोबत डान्समध्ये रंग भरू लागते. तिचा नवा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. याच कार्यक्रमात मनू भाकरने 'देखा तेणू पहली-पहली बार वे' हे गाणेही गायले होते, ज्यामुळे लोक त्याच्या अनेक कलागुणांचे वेड लागले होते.
पीटीआयशी संवाद साधताना मनू भाकरने खुलासा केला होता की, तिला नृत्याची आवड आहे आणि भविष्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षण सुरू ठेवायचे आहे. याशिवाय तिला घोडेस्वारी आणि डान्स हे तिचे छंद असल्याचे सांगितले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू आहे. तिने१० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि त्यानंतर सरबज्योत सिंगसोबत मिश्र सांघिक पिस्तूल स्पर्धेतही कांस्यपदकावर निशाणा साधला. २५ मीटर पिस्तुल प्रकारातही मनू पदकाच्या अगदी जवळ आली होती, पण शेवटी तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.