भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने डायमंड लीगमधील फायनल खेळून २०२४ चा हंगाम संपवला. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजने ८७.८६ मीटर भालाफेकून करून दुसरे स्थान पटकावले. तर या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स याने ८७.८७ मीटर भालाफेक करून अंतिम फेरी जिंकली.
दरम्यान, यंदाचा सीझन संपल्यानंतर नीरजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावर भारताची शूटिंग क्वीन मनू भाकर हिने सीझन संपल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, मनू भाकरने नीरजबाबत पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कमेंटमध्ये तिच्या लग्नाबाबत विचारणा सुरू केली.
वास्तविक, नीरजने सोशल मीडियावर एक पोस्ट करून २०२४ मधील कामगिरीबाबत सांगितले. ज्यामध्ये त्याने सराव करताना हात फ्रॅक्चर झाल्याचेही सांगितले. सोबतच त्याने सीझनच्या शेवटी घडलेल्या काही गोष्टींबाबतही लिहिले. नीरजने लिहिले, "२०२४ चा हंगाम संपत आहे. यानंतर आता मी वर्षभरात घडलेल्या आणि शिकलेल्या सर्व गोष्टींकडे पाहणार आहे. कामगिरीतील सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच काही."
नीरजच्या या पोस्टवर अभिनंदन करताना, मनू भाकरने लिहिले, "नीरज चोप्राचे २०२४ मध्ये एका अप्रतिम हंगामासाठी अभिनंदन. तु लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुढील वर्षांत तुला आणखी यश मिळावे, अशी प्रार्थना करते."
मनू भाकरच्या या पोस्टवर चाहत्यांनी विचित्र कमेंट केल्या आणि तेवढेच विचित्र प्रश्नही विचारले.
एका यूजरने तर विचारले की लग्न कधी होणार? याशिवाय एका यूजरने लिहिले की, "अय-हाय. शुभेच्छा!" दुसऱ्या यूजरने लिहिले, "बरं, तुम्हा दोघांची जोडी चांगली दिसेल.
मनू भाकरच्या पोस्टवर अशा अनेक यूजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नीरज आणि मनू भाकर यांच्या लग्नाबद्दल चाहते बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑलिम्पिकनंतरही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.