पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा आज (३० जुलै) चौथा दिवस आहे. नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन यांसारख्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज आपली ताकद दाखवतील.
भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. भारताच्या जोडीने कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांना पराभूत करून कांस्यपदक जिंकले. भारताने हा सामना १६-१० असा जिंकला.
विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
याआधी मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत मुन भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीचा कांस्यपदकासाठी कोरियाच्या वोन्हो आणि ओह ये जिन यांच्या जोडीशी सामना होता. भारतीय जोडीने हा सामना १६-१० असा जिंकला.
भारताने एकूण ८ राउंड जिंकले, तर कोरियाने ५ फेऱ्या जिंकल्या. या इव्हेंटमध्ये सर्वात आधी १६ गुण मिळवणारा संघ जिंकतो.
यासह मनू भाकर यांनी इतिहास रचला. एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. नॉर्मन प्रिचर्डने १९०० साली दोन पदके जिंकली होती, पण तो मूळचा ब्रिटिश होता. मनू ही पहिला भारतीय आहे. मनूपूर्वी, अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकता आली नव्हती. सरबजोतचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे.
संबंधित बातम्या