Swimming : मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद, या खेळाडूंनी दाखवली चमक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Swimming : मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद, या खेळाडूंनी दाखवली चमक

Swimming : मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद, या खेळाडूंनी दाखवली चमक

Dec 24, 2024 07:19 PM IST

Malvan Open Sea Swimming Competition : मालवण येथे १४वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता.

Swimming : मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद, या खेळाडूंनी दाखवली चमक
Swimming : मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद, या खेळाडूंनी दाखवली चमक

कोकणातील मालवण येथे १४वी राज्यस्तरीय खुली सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या सहकार्याने तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी चिवला बीच येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक आले होते. स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या १० किलोमीटर इव्हेंटमध्ये पुरुष गटात ठाण्याच्या अश्विन कुमार याने सर्वात वेगवान जलतरणपटूचा मान पटकावला तर महिलांच्या इव्हेंटमध्ये बेळगाव येथील डिंपल गोवडा हिने सर्वात जलद जलतरणपटू होण्याचा बहुमान मिळवला.

यानंतर ५०० मीटर मुलांच्या इव्हेंटमध्ये बेळगावचा हर्षवर्धन करलेकर याने बाजी मारली, तर मुलींच्या गटात दुर्वा कुरणकर ही वेगवान जलतरणपटू ठरली . 

यानंतर फिन स्विमिंग १ किलोमीटर प्रकारात ध्रुव धामणे (नाशिक) मुलांमध्ये तर मुलींमध्ये आरनी भंडारी (मुंबई) यांनी बाजी मारली. यानंतर २ किमी गटात  आलोक जाधव (नाशिक),  इयाना पटेल (नाशिक) हे वेगवान जलतरणपटू ठरले. 

ठाणे येथील या खेळाडूंनीही चमक दाखवली

मालवण येथे झालेल्या या स्पर्धेसाठी ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे जलतरण तलावात सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तसेच, त्यांनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यामध्ये अथर्व पवार याने १० किमी आणि ५ किमी जलतरण स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.  

१० किमी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

लौकिक पेडणेकर- सहावा क्रमांक

श्रीकर परांजपे -सातवा क्रमांक

अपूर्व पवार- आठवा क्रमांक

रुद्र शिराळी- नववा क्रमांक

५ किमी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

स्वयम देसाई- सहावा क्रमांक

२ किमी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

अभिर सालस्कर सहावा क्रमाकं

५०० मीटर जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

देवांशी गावकर - चौथा क्रमांक

१ किमी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

अर्णव पाटील- आठवा क्रमांक

पॅरा स्विमिंग स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू

एक किमी पॅरा स्विमिंग स्पर्धेत सोहम देशपांडे याने पाचवा, अर्जुन शाली याने सहावा तर करण नायक याने सातवा क्रमांक मिळवला.

ह्या स्पर्धेत ठाणे येथील ९ ते १८ वर्षे वयोगटातील ३० तरुण जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच ह्या स्पर्धेत सहभागी होऊन खालील जलतरणपटूंनीही उत्तम कामगिरी केली.

यामध्ये प्रतुल्य झगडे, योहान माशी, जयराज नाखवा,  अद्या म्हात्रे, स्वरा हंजनकर, मिहीर पाटील, निधी गोनेला, मल्हार देसाई, स्वराज फडणीस, मनोमय लिंगायत, विघ्नेश सावंत, शार्दूल सोनटक्के, वंशिका अय्यर, अमृता क्षीरसागर, अनन्या रणदिवे, सोहम पंदिरकर, ईशान सुर्वे, आहान सुर्वे, सविओला मास्करेन्हास, मित गुप्ते, ईशान अनेकर आणि वैभव नाखवा यांचाही समावेश आहे.

या संघाला धर्मवीर आनंद दिघे जलतरण तलाव ठाणे येथील मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार तसेच, माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आरती प्रधान यांनी मार्गदर्शन केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग