मराठी बातम्या  /  क्रीडा  /  'मल्लखांबचे पितामह' उदय देशपांडे यांना पद्मश्री, ५० देशांतील लोकांना लावली या खेळाची गोडी

'मल्लखांबचे पितामह' उदय देशपांडे यांना पद्मश्री, ५० देशांतील लोकांना लावली या खेळाची गोडी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 26, 2024 10:31 AM IST

Malkhamb Coach Uday Deshpande : मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मल्लखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले उदय देशपांडे यांनी या खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Malkhamb Coach Uday Deshpande Padma Shri Award
Malkhamb Coach Uday Deshpande Padma Shri Award

Malkhamb Coach Padma Shri Award : केंद्र सरकारने गुरुवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी १३२ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे.

विशेष म्हणजे, यात मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मल्लखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले उदय देशपांडे हे मल्लखांबचे ध्वजवाहक मानले जातात. तसेच, त्यांनी या खेळाला जागतिक स्तरावर पुनरुज्जीवित आणि लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

५० देशांतील ५ हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले

उदय विश्वनाथ देशपांडे यांनी ५० देशांतील ५ हजारांहून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी मल्लखांबची ओळख महिला, अपंग, अनाथ, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकांना करून दिली. जागतिक मल्लखांब महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मल्लखांब पितामह उदय देशपांडे यांनी या खेळाच्या नियमांचे एक पुस्तकही तयार केले. या खेळातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना वयाच्या ७० व्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित

यापूर्वी उदय देशपांडे यांचा महाराष्ट्र शासनाने 'शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव' या मानाच्या पुरस्कारानेदेखील सन्मान केला आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उदय देशंपाडे यांनी प्रतिक्रियाही समोर आली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ते म्हणाले की, या पुरस्करामुळे मल्लखांब या खेळाला राजमान्यता मिळेल आणि देशाबाहेर मल्लखांबाच्या प्रसारास ती महत्वाची ठरणार आहे. तसेच, देशपांडे यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय श्री समर्थ व्यायाममंदिराचे संस्थापक व्यायाममहर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे यांच्यासह आपल्या परिवाराला दिले.

WhatsApp channel