मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Vijay Zol: क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजकाला धमकी, क्रिकेटपटूविरोधात गुन्हा दाखल

Vijay Zol: क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजकाला धमकी, क्रिकेटपटूविरोधात गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 17, 2023 09:40 AM IST

Crypto Currency: क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात नुकसान झाल्याने भारताच्या अंडर १९ संघाचा माजी कर्णधार आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोलविरोधात एका उद्योजकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आळाय.

Vijay Zol
Vijay Zol

Vijay Zol: टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोलविरोधात एका उद्योजकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून विजय झोलने उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी जालन्यातील घनसांगी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली होती. परंतु, या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्यानंतर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार उद्योदक किरण खरात यांनी घनसांगी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विजय झोल याची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

विजय झोल यांच्यावर धमकावल्याचा आरोप करणाऱ्या किरण खरात यांच्यावरही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून फसवणुकीचा केल्याचा आरोप करण्यात आला. किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने ज्यादा पैशाचे आमिष दाखूवून साडेबारा लाखांची फसवणूक केल्याची तक्रारदाराचे म्हणणे आहे. याप्रकरणी खरात दाम्पत्यांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

WhatsApp channel

विभाग