Madhya Pradesh Black Magic: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तंत्रेविद्येद्वारे घरगुती समस्या सोडवण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ३८ वर्षीय भोंदूबाबाला अटक करण्यात आली. तुझ्यातील आत्मा शांत करण्यासाठी शाररिक संबंध ठेवावे लागतील, असे म्हणत महिलेवर वारंवार बलात्कार केला. याशिवाय, भोंदूबाबाने महिला आणि तिच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सुरियाल असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. आरोपी हा खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. त्याने आतापर्यंत किती महिलांना आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पीडित महिला तिच्या पतीशी संबंधित असलेल्या घरगुती समस्येबाबत मदतीसाठी भोंदूबाबाकडे गेली होती. तेव्हा आरोपीने पीडित महिलेच्या शरिरात एक जिन आहे. या जिनला शांत करण्यासाठी शाररिक संबंध ठेवावे लागतील. ज्यामुळे जिन शांत होईल आणि सर्व घरगुती समस्या दूर होतील, असे सांगत भोंदूबाबने तिच्यावर अत्याचार केले.
भोंदूबाबाने अनेकवेळा या महिलेवर बलात्कार केला. याबाबात कुठेही वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या पतीला मारून टाकू, अशी धमकी भोंदूबाबाने पीडित महिलेला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.