मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs GG WPL 2023 Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय, गुजरात ५५ धावांनी पराभूत

MI vs GG WPL 2023 Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय, गुजरात ५५ धावांनी पराभूत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 14, 2023 07:27 PM IST

MI vs GG Live Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा १२ वा सामना आज (१४ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५५ धावांनी विजय मिळवला.

MI vs GG Live Score WPL 2023
MI vs GG Live Score WPL 2023

WPL Live Cricket Score, MUM vs GUJ Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगचा १२ वा सामना आज (१४ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १०७ धावाच करू शकला.

MI vs GG Score Updates WPL 2023

मुंबई इंडियन्स विजयी

महिला प्रीमियर लीगच्या १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा ५५ धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १०७ धावाच करू शकला.

मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. १० गुणांसह हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. याशिवाय या स्पर्धेत आतापर्यंत २०० पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ पहिला विकेट पडल्यानंतरच दबावात आला. त्यानंतर शेवटपर्यंत संघ यातून सावरू शकला नाही. गुजरातकडून हरलीन देओलने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर मुंबईकडून नॅट सीव्हर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

MI vs GG Live Score : गुजरातच्या सात विकेट पडल्या

८५च्या स्कोअरवर गुजरातच्या सात विकेट पडल्या आहेत. दयालन हेमलता सहा धावा करून आणि स्नेह रामा २० धावा करून बाद झाले. हेमलताला अमेलिया केरने तर राणाला सीवर ब्रंटने बाद केले. सध्या सुषमा वर्मा आणि किम गर्थ क्रीजवर आहेत. गुजरातला ३० चेंडूत ७७ धावांची गरज आहे.

MI vs GG Live Score : गुजरातचा निम्मा संघ तंबूत

गुजरातला चौथा धक्का नवव्या षटकात ४८ धावांवर बसला. इझी वोंगने हरलीनला एलबीडब्ल्यू आऊट केले. तिला २३ चेंडूत २२ धावा करता आल्या. यानंतर अमेलिया केरने १०व्या षटकात ऍशले गार्डनरला कलिताकरवी झेलबाद केले. गार्डनरला आठ धावा करता आल्या. १० षटकांनंतर गुजरातची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात ४९ आहे. गुजरातला अजून ६० चेंडूत ११४ धावांची गरज आहे. कर्णधार स्नेह राणा आणि दयालन हेमलता सध्या क्रीजवर आहेत.

MI vs GG Live Score : एकाच षटकात दोन धक्के

गुजरात जायंट्सला सहाव्या षटकात दोन धक्के बसले. हे दोन्ही धक्के हेली मॅथ्यूजने दिले. तिने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एस मेघनाला अमेलिया केरकरवी झेलबाद केले. मेघनाला १६ धावा करता आल्या. यानंतर अॅनाबेल सदरलँड शेवटच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाली. सदरलँडला खातेही उघडता आले नाही. सात षटकांनंतर गुजरातची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ३७ धावा आहे. संघाला ७८ चेंडूत १२६ धावांची गरज आहे. सध्या हरलीन देओल आणि ऍशले गार्डनर क्रीजवर आहेत.

MI vs GG Live Score : गुजरातला पहिल्याच चेंडूवर धक्का 

डावाच्या पहिल्याच चेंडूवर गुजरात जायंट्सला धक्का बसला. नॅट सीव्हर ब्रंटने सोफिया डंकलेला एलबीडब्ल्यू बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. सध्या हरलीन देओल आणि मेघना क्रीजवर आहेत.

MI vs GG Live Score : मुंबईच्या १६२ धावा 

मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्ससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच, यास्तिका भाटियाने ४४ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. इनफॉर्म बॅट्समन हेली मॅथ्यूजला डावाच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाद झाली. तिला एशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. नेट सीव्हरने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या.

यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले ती ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा करुन बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. अमेलिया १९ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले, पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतला गार्डनरने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले.

हरमनप्रीतने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. गुजराततर्फे अॅश्ले गार्डनरने ३ बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

MI vs GG Live Score : मुंबईला सलग दोन धक्के

मुंबईला तीन चेंडूंत दोन धक्के बसले आहेत. १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तनुजा कंवरने अमेलिया केरला किम गर्थकरवी झेलबाद केले. तिला १३ चेंडूत १९ धावा करता आल्या. यानंतर १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्नेह राणाने इझी वोंगचा स्वताच्याच चेंडूवर झेल टिपला. तिला खातेही उघडता आले नाही. मुंबईची धावसंख्या १८ षटकांत ५ बाद १३७ अशी आहे. सध्या हरमनप्रीत कौर आणि हुमैरा काझी क्रीजवर आहेत.

MI vs GG Live Score : मुंबईला तिसरा धक्का

मुंबईला १३व्या षटकात ८४  धावांवर तिसरा धक्का बसला. यास्तिका भाटिया धावबाद झाली. तिने ३७ चेंडूत ४४ धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत तिने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. १३ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या तीन बाद ९३ अशी आहे. सध्या हरमनप्रीत कौर सहा धावा करून आणि अमेलिया कार पाच धावांवर खेळत आहेत.

MI vs GG Live Score : मुंबईला दुसरा धक्का

मुंबईला ११व्या षटकात ७५ धावांवर दुसरा धक्का बसला. नॅट सीव्हर ब्रंट ३१ चेंडूत ३६ धावा करून बाद झाली. नेटने यास्तिका भाटियासह ६२ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. 

MI vs GG Live Score : मुंबईला पहिला धक्का

पहिल्याच षटकात मुंबईला मोठा धक्का बसला आहे. ऑफस्पिनर ऍशले गार्डनरने फॉर्मात असलेली फलंदाज हेली मॅथ्यूजला सोफिया डंकलेकरवी झेलबाद केले. एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर एक धाव आहे. सध्या नॅट सीव्हर ब्रंट आणि यास्तिका भाटिया क्रीजवर आहेत.

MI vs GG Live Score WPL 2023 : दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

मुंबई इंडियन्स:

 हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुर्जर, अमेलिया केर, इसी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

गुजरात जायंट्स

सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, तनुजा कंवर, स्नेह राणा (कर्णधार), मानसी जोशी.

MI vs GG Live Score : गुजरातची प्रथम गोलंदाजी

गुजरात जायंट्सची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या कर्णधाराने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. एल वोल्वार्ड आणि जॉर्जिया वेअरहॅम यांच्या ऐवजी सोफिया डंकले आणि अॅनाबेल सदरलँड यांना संघात घेतले आहे. दुसरीकडे, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणताही बदल केलेला नाही.

 

WhatsApp channel