LSG Vs SRH IPL highlights 2023 : लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौकडून कृणाल पांड्याने चमकदार कामगिरी केली.
या सामन्यात लखनौ संघाने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली. या मोसमातील त्यांनी दुसरा विजय नोंदवला आहे. १२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघासाठी कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पंड्या यांनी फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावली. या मोसमातील सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
त्यापूर्वी, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. हैदराबादचा संघ २० षटकांत ८ विकेट गमावत केवळ १२१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ षटकांत ५ गडी गमावून १२७ धावा करून सामना जिंकला.
लखनौसाठी निकोलस पूरनने षटकार मारून सामना संपवला. त्याने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नटराजनला षटकार ठोकला. सहा चेंडूत ११ धावा करून तो नाबाद राहिला. मार्कस स्टॉइनिसने १३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. हैदराबादकडून आदिल रशीदने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
मेयर्स आणि दीपक हुडाची बॅट चालली नाही
सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणाऱ्या काइल मेयर्सला या सामन्यात काही खास करता आले नाही. तो १४ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. तो फजलहक फारुकीच्या चेंडूवर मयंक अग्रवालकरवी झेलबाद झाला. दीपक हुडा आठ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. भुवनेश्वरने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल घेतला.
कृणाल-राहुलची महत्वपूर्ण भागीदारी
४५ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर सनरायझर्स संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते, परंतु कर्णधार केएल राहुलने कृणाल पांड्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५५ धावांची भागीदारी केली. क्रुणाल २३ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. केएल राहुलला सामना पूर्ण करता आला नाही. संघ विजयापासून ८ धावा दूर असताना तो आदिल रशीदच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. राहुलने ३१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने चार चौकार मारले. रोमारियो शेफर्ड खाते उघडू शकला नाही. त्यालाही आदिल रशीदने बाद केले.
शेवटी निकोलस पूरनने षटकार मारून सामना संपवला. त्याने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नटराजनला षटकार ठोकला. सहा चेंडूत ११ धावा करून तो नाबाद राहिला. मार्कस स्टॉइनिसने १३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.
े
संबंधित बातम्या