Paris Olympics 2024 News: ऑलिम्पिकच्या गेल्या काही स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या संख्येसह त्यांच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये एकूण १२४ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता, जी ऑलिम्पिक खेळात भारताने पाठवलेली सर्वात मोठी तुकडी होती. दरम्यान, २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ सुवर्णपदकावर नाव कोरले होते. या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रकाशझोतात आला. नीरज चोप्राने अनेक स्पर्धेत भारतासाठी पदके जिंकली आहेत. येत्या २०२४ मध्ये पॅरिसमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पदकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी भारत खेळाडूंच्या संख्येतही वाढ करत आहे. नेमबाज भवनीश मेंदीरत्ताने आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविणारा तो पहिला भारतीय ठरला. रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग हे अॅथलेटिक्स प्रकारात पात्र ठरणारे पहिले भारतीय बनले. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.
भवनीश मेंदीरत्ता, रुद्रंक्ष पाटिल, स्वप्निल कुसाले, अखिल श्योराण, मेहुली घोष, सिफ्त कौर समरा, राजेश्वरी कुमारी, अक्षदीप सिंह, प्रियंका गोस्वामी, विकास सिंह, परमजीत बिष्ट, मुरली श्रीशंकर, अविनाश सेबल, नीरज चोप्रा, पारुल चौधरी, अंतिम पंघल, निकहत जरीन, प्रीति पवार, परवीन हुडा, लवलीना बोरगोहेन, किशोर जेना, टीम इंडिया हॉकी पुरुष संघ, सरबजोत सिंह, अर्जुन बाबुता, तिलोत्तमा सेन.
भारतीय महिला फुटबॉल संघाला गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जपानकडून ७-० असा पराभव पत्करावा लागला. ताश्कंदमधील लोकोमोटिव्ह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.भारताचा पुढील सामना रविवारी व्हिएतनामशी होणार आहे.