मराठी बातम्या  /  क्रीडा  /  rahul athiya : कोहलीनं राहुल-अथियाला आहेरात दिली सव्वा दोन कोटींची BMW कार, धोनीनं काय दिलं पाहा!

rahul athiya : कोहलीनं राहुल-अथियाला आहेरात दिली सव्वा दोन कोटींची BMW कार, धोनीनं काय दिलं पाहा!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 26, 2023 01:12 PM IST

KL Rahul Wedding Gift: भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नात अनमोल भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला आहे.

KL Rahul- Athiya Shetty
KL Rahul- Athiya Shetty

KL Rahul- Athiya Shetty Wedding: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काल विवाहबंधनात अडकले. अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर निवडक पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला. सध्या केएल राहुल- आथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या आहेरात आलेल्या भेटवस्तूंची जबरदस्त चर्चा रंगली आहे.या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या गिफ्टचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने केएल राहुलला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली आहे. या कारची किंमत जवळपास सव्वा दोन कोटी आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही केएल राहुलच्या लग्नात कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे. त्याची किंमत जवळपास ८० लाख रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीने या जोडप्याला मुंबईत एक सुपर लक्झरी अपार्टमेंट गिफ्ट केला आहे, ज्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये आहे. जॅकी श्रॉफने या जोडीला घड्याळ भेट दिले आहे, ज्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. अभिनेता अर्जुन कपूरने १.५ कोटी रुपयांचे डायमंड ब्रेसलेट, तर सलमान खानने १.६४ कोटी रुपयांची ऑडी कार भेट दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या लाडक्या मित्राला बाईक भेट दिली आहे, जिची किंमत सुमारे ८० लाख रुपये इतकी आहे. तर, विराट कोहलीने या जोडीला एक BMW कार भेट दिली आहे, जिची किंमत सुमारे २.१७ कोटी रुपये आहे.

अथिया आणि केएल राहुल दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी खंडाळ्यातील बंगल्यात अत्यंत साध्या पद्धतीने सात फेरे घेतले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे ३ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग