मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kyle mayors Six: शॉट ऑफ द सेंच्युरी! काईल मेयर्सची अप्रतिम टायमिंग… ‘हा’ षटकार एकदा पाहाच!

Kyle mayors Six: शॉट ऑफ द सेंच्युरी! काईल मेयर्सची अप्रतिम टायमिंग… ‘हा’ षटकार एकदा पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 07:32 PM IST

Kyle mayors Six video: वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर अप्रतिम षटकार ठोकला. या षटकाराच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १०५ मीटरच्या या सिक्सला शॉट ऑफ द सेंच्युरी म्हटले जात आहे.

Kyle mayors
Kyle mayors (twitter)

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना क्वीन्सलँड येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या संघाने सामना खूपच रोमांचक स्थितीक नेला होता. पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज काइल मेयर्सने एक उत्तुंग षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. मेयर्सने कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या वरुन षटकार ठोकला. हा षटकार पाहून तुमच्या तोंडातून देखील मेयर्सबाबत कौतुकाचे शब्द बाहेर पडतील.

डावाच्या चौथ्या षटकात मेयर्सने ग्रीनला कव्हर्सवर १०५ मीटर लांब षटकार मारला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत मेयर्सचे कौतुक केले आहे. मेयर्सचा हा शॉट खरोखरच अविश्वसनीय आहे. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४५ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिजचे अतिशय खराब क्षेत्ररक्षण

या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ५८ धावांवर ५ विकेट गमावल्या. या सामन्यावर वेस्ट इंडिजची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसत होते, मात्र त्यानंतर कर्णधार अॅरॉन फिंच आणि मॅथ्यू वेडने डाव सावरला. फिंचने ५३ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळली आणि कारकिर्दीतील १८ वे अर्धशतक झळकावले. तर वेडने २९ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावांची गरज होती.

शेल्डन कॉट्रेलने शेवटचे षटक टाकले. मात्र, या षटकात वेस्ट इंडिजच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली नाही. या षटकात वेड आणि स्टार्क या दोन्ही फलंदाजांचे झेल सोडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या