प्रख्यात कवी कुमार विश्वास हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच कुमार विश्वास यांनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. विश्वास यांनी सैफ-करिनाचा मोठा मुलगा तैमूर याच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण केला.
यानंतर आता कुमार विश्वास यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
सानियाने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. कुमार विश्वास यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ २०११ चा आहे.
व्हिडिओमध्ये कुमार विश्वास म्हणतात, की ‘गेल्या वर्षी आमची एक टेनिसपटू सानिया मिर्झा हिचे लग्न झाले याला माझा आक्षेप नाही, मला आक्षेप या गोष्टीचा आहे की तिने आयुष्यभर ‘शोहरत हिंदुस्तान से ली और शौहर पाकिस्तान से’ लिया. मी तिला एसएमएसही पाठवला होता की तुला हिटर हवा असेल तर आमच्याकडे युसूफ पठाणही आहे, तू एवढ्या लांब कशाला जात आहेस."
भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांमधील घटस्फोटाच्या बातम्या दिवसांपासून येत होत्या. पण गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ही गोष्ट निश्चित झाली. शोएब मलिकने जानेवारीमध्ये पाकिस्तानी मॉडेल सना जावेदसोबत लग्न केले.
सानिया टेनिसमधून निवृत्त झाली असून ती आपल्या मुलासोबत दुबईत राहते. शोएब आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळतो.
संबंधित बातम्या