मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KKR vs PBKS IPL 2023 : अखेरच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा पराभव, रिंकु-रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो

KKR vs PBKS IPL 2023 : अखेरच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा पराभव, रिंकु-रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो

May 08, 2023 11:30 PM IST

KKR vs PBKS IPL 2023 : रिंकु सिंह आणि आंद्रे रसेलने वादळी खेळी करत केकेआरला पंजाबविरोधात विजय मिळवून दिला आहे.

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score (HT)

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात निर्णायक सामना रंगणार आहे. कारण आजच्या सामन्यातील निकालावर दोन्ही संघांचं स्पर्धतील भवितव्य अवलंबून असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने चार आणि पंजाबने पाच विजय मिळवलेले आहे. त्यामुळं आजच्या सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

 

अखेरच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा पराभव, रिंकु-रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो

 • अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात केकेआरने बाजी मारली आहे. रिंकु सिंह आणि आंद्रे रसेलने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाला विजय मिळवून दिला आहे. नितीश राणा आणि जेसन रॉय यांनी देखील चांगली फटकेबाजी करत केकेआरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

रिंकु सिंह आणि आंद्रे रसेलची फटकेबाजी, केकेआर विजयाच्या दिशेने

 • नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर आता रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. केकेआरला १५ चेंडूत ३१ धावांची गरज आहे.

जेसन रॉय आणि नितीश राणाकडून पंजाब किंग्जची धुलाई, केकेआरला विजयासाठी ६३ धावांची गरज

 • पंजाबने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची चांगली सुरुवात झाली आहे. सलामीवीर जेसन रॉय आणि गुरबाजने पॉवपप्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं आहे. त्यानंतर आता कर्णधार नितीश राणा ४९ आणि आंद्रे रसेल सहा धावांवर खेळत आहे. केकेआरला विजयासाठी ३० चेंडूत ५८ धावांची गरज आहे.

पंजाबचा डाव संपला, केकेआरसमोर विजयासाठी १८० धावांचं लक्ष्य

 • हरप्रीत ब्रार, शाहरुख खान आणि रिषी धवन यांनी अखेरच्या षटकात वादळी खेळी करत पंजाबला १८० धावांची मोठी धावसंख्या उभारून दिली आहे. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक ५८ धावा केल्या. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने तीन, हर्षितने दोन आणि सुयश शर्मा-नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

केकेआरच्या फिरकीसमोर पंजाबची पडझड, वरुण चक्रवर्तीचे दोन बळी

 • हर्षित पटेलने पावरप्लेमध्ये दोन बळी घेतल्यानंतर केकेआरच्या फिरकीसमोर पंजाबच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आहे. कर्णधार शिखर धवन ५७ धावांवर आणि जितेश शर्मा २१ धावांवर बाद झाले आहे. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने दोन तर नितीश राणाने एक विकेट घेतली आहे. १६ षटकांनंतर पंजाबने १३१ धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्जला तिसरा धक्का, धवन-जितेशने डाव सावरला

 • लियाम लिविंगस्टोनच्या रुपात पंजाब किंग्जची तिसरी विकेट पडली आहे. केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने त्याची विकेट घेतली आहे. त्यानंतर आता कर्णधार शिखर धवनने (३३) आणि जितेश शर्माने (२०) पंजाबचा डाव सावरला आहे. ११ षटकांनंतर पंजाबचा स्कोर ९३ धावांवर पोहचला आहे.

पंजाबचे दोन फलंदाज तंबूत, धवन-लिविंगस्टोन क्रीझवर

 • पंजाबच्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. कारण सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि भानुका राजपाक्षे स्वस्तात बाद झाले आहे. केकेआरच्या हर्षित राणा याने दोघांची विकेट घेतली आहे. पाचव्या षटकाअखेर पंजाबचा स्कोर ५१ धावांवर पोहचला असून कर्णधार शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन खेळत आहे.

पंजाब किंग्जने टॉस जिंकला, केकेआरची प्रथम गोलंदाजी

 • पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता नितीश राणाच्या केकेआरला पहिल्यांदा गोलंदाजी करावी लागणर आहे. शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग थोड्याच वेळात पंजाबच्या डावाची सुरुवात करणार आहेत.

आजच्या सामन्यात कोणत्या खेळाडूवर असेल लक्ष...

 • केकेआरचा कर्णधार नितीश राणा, जेसन रॉय, आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर केकेआरच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच पंजाबचा कर्णधार शिखर धवन, जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

कोलकात्याची खेळपट्टी कशी असेल?

 • कोलकातामधील इडन गार्डन मैदानावर आजचा सामना होणार आहे. होम ग्राउंडवर सामना होणार असल्यामुळं केकेआरला त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच सपाट खेळपट्टीमुळं त्यावर पंजाबचे विस्फोटक खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतात. त्यामुळं आजच्या सामन्यात केकेआरच्या आंद्रे रसेल तसेच पंजाबच्या लियाम लिविंगस्टोनच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.

कोलकाता नाइट रायडर्सची संभावित प्लेईंग ११ :

 • नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, आर गुरबाज (विकेटकिपर), रिंकू सिंह, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती आणि मनदीप सिंग

पंजाब किंग्जची संभावित प्लेईंग ११ :

 • शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकिपर), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग

WhatsApp channel