मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Ire Series : श्रेयस-बुमराह आयर्लंड मालिकेत खेळणार, केएल राहुलनंही सुरू केला फलंदाजीचा सराव

Ind vs Ire Series : श्रेयस-बुमराह आयर्लंड मालिकेत खेळणार, केएल राहुलनंही सुरू केला फलंदाजीचा सराव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 17, 2023 08:52 PM IST

KL Rahul fitenss update : आयपीएल 2023 मध्ये दुखापत झालेल्या केएल राहुलने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. राहुलच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे.

KL Rahul
KL Rahul

KL Rahul Batting Practice Video : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे या दौऱ्यावर संघासोबत नाहीत. यामध्ये केएल राहुलचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, यादरम्यान टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, आयपीएल 2023 दरम्यान जखमी झालेल्या केएल राहुलने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे.

केएल राहुलची आयपीएल टीम लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली होती. यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की केएल राहुल आता आशिया कप 2023 मधून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की तो आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

बुमराह आणि अय्यर आयर्लंड मालिकेत खेळणार

जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२३आणि टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो सहभागी होऊ शकला नाही. त्याचवेळी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करणार आहेत. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अय्यर आणि बुमराह उपलब्ध असतील, असेही या सांगण्यात येत आहे.

WhatsApp channel