KL Rahul : केएल राहुल आशिया कपमधूनही बाहेर होऊ शकतो, बुमराहचं काय होणार? पाहा फिटनेस अपडेट-kl rahul may be ruled out from asia cup 2023 also due to injury kl rahul may will be miss upcoming asia cup bumrah ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul : केएल राहुल आशिया कपमधूनही बाहेर होऊ शकतो, बुमराहचं काय होणार? पाहा फिटनेस अपडेट

KL Rahul : केएल राहुल आशिया कपमधूनही बाहेर होऊ शकतो, बुमराहचं काय होणार? पाहा फिटनेस अपडेट

Jun 24, 2023 09:04 PM IST

KL Rahul Asia Cup 2023 : केएल राहुल सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. एका रिपोर्टनुसार तो २०२३ च्या आशिया कपमध्येही खेळू शकणार नाही.

KL Rahul Asia Cup 2023
KL Rahul Asia Cup 2023

KL Rahul Asia Cup 2023 Team India : भारताने नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये केएल राहुलला स्थान देण्यात आलेले नाही. दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. पण सध्या पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही.

अशातच केएल राहुलबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, राहुल आशिया कप 2023 मध्येही खेळू शकणार नाही, असे बोलले जात आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराहही संघाबाहेर आहे. मात्र बुमराह लवकरच परतेल अशी अपेक्षा आहे.

केएल राहुल आशिया कपमधूनही बाहेर होऊ शकतो

दुखापतीमुळे राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला होता. एका स्पोर्ट्स वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केएल राहुल आता आशिया कप 2023 मधूनही बाहेर होऊ शकतो. आयपीएलमधील दुखापतीनंतर राहुल शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेला होता. यानंतर तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मेहनत घेत आहे. येथे त्याची फिजिओथेरपीही केली जात आहे. आशिया चषकात राहुलचे पुनरागमन अपेक्षित होते. मात्र सध्या तो फिट होऊ शकलेला नाही. याच कारणामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावरही राहुलला टीम इंडियात स्थान मिळाले नाही.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही दुखापतीमुळे बाहेर आहे. मात्र त्याचे पुनरागमन लवकरच होऊ शकते. वनडे विश्वचषकापूर्वी बुमराहने पुनरागमन करावे अशी भारतीय संघाची इच्छा आहे. रिपोर्टनुसार, बुमराह ७० टक्के फिट झाला आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया

वन डे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.