मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS AUS 3rd TEST : उरलेल्या दोन कसोटीसाठी आज संघाची निवड, सर्फराज-मयंकची एन्ट्री होणार?

IND VS AUS 3rd TEST : उरलेल्या दोन कसोटीसाठी आज संघाची निवड, सर्फराज-मयंकची एन्ट्री होणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 19, 2023 05:28 PM IST

team india for ind vs aus 3rd test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी शिव सुंदर दास यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची निवड केली जाणार. त्याचवेळी नागपूरनंतर दिल्ली कसोटीत फ्लॉप ठरलेल्या केएल राहुलची हकालपट्टी जवळपास निश्चित झाली आहे.

team india for ind vs aus 3rd test
team india for ind vs aus 3rd test

दिल्ली कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे टीम इंडियाने ४ कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील उरलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (१९ फेब्रुवारी) शिव सुंदर दास यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची निवड होणार आहे. नागपूरपाठोपाठ दिल्ली कसोटीत फ्लॉप ठरलेला केएल राहुल तिसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर होईल, असे मानले जात आहे. केएल राहुलने नागपूर कसोटीत २० धावा केल्या, तर दिल्ली कसोटीच्या दोन्ही डावात त्याने अनुक्रमे १७ आणि १ धाव ेकेली.

सर्फराज-मयंक अग्रवालची निवड होणार?

विशेष म्हणजे, आज बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना संपला आहे. अशा स्थितीत या दोन्ही संघातून खेळाडू निवडले जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुलला डच्चू मिळू शकतो. त्याच्या जागी मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानला संधी मिळू शकते. वास्तविक, सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२३ च्या मोसमात १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. तसेच, सलामीवीर मयंक अग्रवालचीदेखील निवड केली जावू शकते.

याशिवाय निवडकर्ते जसप्रीत बुमराहचादेखील विचार करू शकतात. मात्र, जसप्रीत बुमराहला खेळणे फिटनेसवर अवलंबून असेल.

अलीकडेच चेतन शर्मा यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. म्हणजेच शिवसुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती प्रथमच संघाची निवड करणार आहे.

WhatsApp channel