मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Shetty: केएल-अथियाच्या लग्नाची तारीख जाहीर, ‘या’ आलिशान बंगल्यात घेणार सात फेरे

KL Rahul Athiya Shetty: केएल-अथियाच्या लग्नाची तारीख जाहीर, ‘या’ आलिशान बंगल्यात घेणार सात फेरे

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 09, 2023 09:43 PM IST

KL Rahul Athiya Shetty Wedding date: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी खंडाळा येथील बंगल्यात सात फेरे घेणार आहेत. सुत्रांनुसार, येत्या २० जानेवारी दोघेही विवाह बंधनात अडकू शकतात. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

KL Rahul Athiya Shetty Wedding
KL Rahul Athiya Shetty Wedding

KL Rahul Athiya Shetty Marriage Date: भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राहुल अनेक दिवसांपासून सुनिल शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात सात फेरे घेतील. हा बंगला सुनील शेट्टी याचा आहे. इथेच दोघे एकमेकांशी पवित्र बंधनात बांधले जातील. दोघांचा विवाहसोहळा अतिशय भव्य असेल. या सोहळ्यात फक्त दोन्ही बाजूंनी नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.

राहुल आणि अथिया बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच दोघेही नवीन वर्षाच्या पार्टीत मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसले होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल २० जानेवारीला खंडाळा येथील बंगल्यात लग्न करू शकते. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्स सहभागी होतील.

WhatsApp channel