कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२५ साठी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये कोलकात्याला चॅम्पियन बनवणारा कर्णधार श्रेयस अय्यर रिलीज झाला आहे. आगामी हंगामासाठी केकेआरने एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांना आयपीएल २०२५ साठी कायम ठेवले आहे. केकेआरने ४ कॅप्ड खेळाडू आणि २ अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन केले आहे.
केकेआरने रिंकू सिंग याला १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. आयपीएल २०२४ पर्यंत त्याचा पगार ५५ लाख रूपये होता. यानंतर वरुण चक्रवर्ती १२ कोटी, सुनील नारायण १२ कोटी, आंद्रे रसेल १२ कोटी, हर्षित राणा ४ कोटी आणि रामनदिन सिंग ४ कोटी रूपयां रिटेन करण्यात आले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने ६ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी १२० कोटींपैकी ५७ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता IPL २०२५ च्या मेगा लिलावात KKR कडे ६३ कोटी रुपये असतील.
कोलकाता नाईट रायडर्सने आपला कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आहे. अशा परिस्थितीत आता केकेआरला लिलावातून कर्णधार विकत घ्यावा लागेल किंवा राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी एकाकडे कमान सोपवावी लागेल. यापूर्वी असे बोलले जात होते की केकेआरला सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवायचे आहे. पण सूर्या आता मुंबई इंडियन्समध्येच राहणार आहे. अशा स्थितीत केकेआरला नवा कर्णधार शोधावा लागेल.
संबंधित बातम्या