Khel ratna award 2024 announced : भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. मनु भाकर (Manu Bhakar) आणि डी गुकेशसह (D Gukesh) ४ खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे तर ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मनु भाकर आणि डी गुकेश यांच्याशिवाय हॉकी खेळाडू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा एथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांनाही खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना १७ जानेवारी २०२५ (शुक्रवार) सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
नेमबाज मनू भाकरच्या नावावरून बराच वाद झाला होता, सुरुवातीला तिचे नाव पुरस्कारासाठी नामांकनांच्या यादीत नव्हते. मात्र, नंतर मनू भाकरने स्पष्ट केले की, उमेदवारी अर्ज भरताना आपल्याकडून चूक झाली आणि ती दुरुस्त करण्यात आली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकून २२ वर्षीय मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. तिने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले.
याच ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीतने भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसरे ब्राँझपदक मिळवून दिले आणि भारतीय खेळातील आपला वारसा आणखी मजबूत केला. दरम्यान, १८ वर्षीय बुद्धिबळपटू गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता बनून चर्चेत आले. गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा हा १८ वर्षीय खेळाडू सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता.
चौथ्या विजेत्या प्रवीण कुमारला पॅरिस पॅरालिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले, जिथे त्याने टी ६४ प्रकारात उंच उडीचे विजेतेपद पटकावले. टी ६४ वर्गीकरण गुडघ्याखाली एक किंवा दोन्ही पाय गमावलेल्या खेळाडूंसाठी आहे, जे धावण्यासाठी कृत्रिम पायावर अवलंबून असतात. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा हाय जंपर प्रवीणने टी-६४ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. गुडघ्याच्या खाली एक किंवा दोन्ही पाय नसलेले आणि धावण्यासाठी कृत्रिम पायांवर अवलंबून असलेल्या खेळाडूंची ही श्रेणी आहे.
यावेळी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. त्याचबरोबर प्रशिक्षकांच्या श्रेणीतही क्रिकेट संबंधित कोणत्याही व्यक्तीचे नाव सामील नाही.
1. ज्योति याराजी (अॅथलेटिक्स)
2. अन्नू रानी (अॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जरमनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजीत सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा नेमबाजी)
12. प्रीति पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ति (पॅरा अॅथलेटिक्स)
14. अजीत सिंह (पॅरा अॅथलेटिक्स)
15. सचिन सरजेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
17. प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
18. एच होकाटो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्या सुमति सिवान (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा जूडो)
26. मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग)
27. रुबीना फ्रांसिस (पॅरा शूटिंग)
28. स्वप्निल सुरेश कुसाले (शूटिंग)
29. सरबजोत सिंह (शूटिंग)
30. अभय सिंह (स्क्वॅश)
31. साजन प्रकाश (जलतरण)
32. अमन (कुस्ती)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
3. संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
2. अर्मांडो एग्नेलो कोलाको (फुटबॉल)
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
1. फिजिकल एजुकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया
मौलाना अबुल कलाम आजाद (MAKA) ट्रॉफी 2024
1 चंडीगढड विद्यापीठ (ओवरऑल विनर यूनिवर्सिटी)
2. लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी, (1st रनर-अप यूनिवर्सिटी)
3. गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (सेकेंड रनर अप यूनिवर्सिटी)
संबंधित बातम्या