Kapil Dev : कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kapil Dev : कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत

Kapil Dev : कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत

Jul 13, 2024 01:31 PM IST

Kapil Dev to BCCI:ज्येष्ठ क्रिकेट पटू कपिल देव यांनी अंशुमन गायकवाडच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बीसीसीआयला अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत देण्याची विनंती केली. माजी खेळाडूंना बोर्डाकडूंन पाठिंबा दिला जात नसल्याचे देखील त्यांनी अधोरेखित करून मदतीसाठी क्रिकेट बोर्डाला आवाहन केले होते.

कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत
कपिल देव यांचे बीसीसीआयला साकडे! 'या' महान खेळाडूसाठी मागितली आर्थिक मदत (Ravi Upadhyay)

Kapil Dev to BCCI : भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने लंडनमध्ये ब्लड कॅन्सरची लढा देत असलेल्या माझी क्रिकेटपटू व भारताला १९८४ विश्वचषक मिळवून देणाऱ्या अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत द्यावी यासाठी बीसीसीआयला विनंती केली आहे. कपिल देव म्हणाले, त्याच्या काळात भारतीय क्रिकेट बोर्डाकडे फारसे पैसे नव्हते. मात्र, बीसीसीआय आता आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. भारतीय संघाने टी २० यशामुळे आपल्या माजी खेळाडूंना मदत करण्याचा बीसीसीआयने मार्ग शोधायला हवा, असे देखील देव म्हणाले.

स्पोर्टस्टारशी बोलताना कपिल देव म्हणाले, 'ही बाब दु:खद व अत्यंत निराशाजनक आहे. अंशुमनच्या या स्थिती बद्दल मला वेदना होत आहे. कारण मी अंशुमनबरोबर खेळलो आहे. त्याला या अवस्थेत पाहणे सहन होत नाही. कुणालाही असा त्रास होऊ नये. मला विश्वास आहे की भारतीय क्रिकेट बोर्ड त्याची काळजी घेईल. आम्ही कुणावरही जबरदस्ती करणार नाही. अंशुमनसाठी कोणतीही मदत मनापासून करावी लागणार आहे. त्यावेळी वेगवान गोलंदाजांसमोर उभे असताना त्याने चेहऱ्यावर आणि छातीवर वार झेलले. त्याने भारतीय संघासाठी मोठे कार्य केले असून आता त्याच्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की भारतीय क्रिकेट चाहते त्याला अपयशी ठरवणार नाहीत. अंशुमन बरा व्हावा यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी, असे आवाहन देखील देव यांनी केले आहे.

सध्या देशात माजी क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी कोणतीही योजना अथवा यंत्रणा नाही. सध्या बीसीसीआयकडे भरपूर पैसा आहे, हे लक्षात घेऊन माजी क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी बोर्डाने उपाययोजना करायला हव्यात, असे देखील कपिल देव म्हणाले.

या पिढीतील खेळाडू चांगले पैसे कमावतात हे पाहून खूप आनंद होत आहे. सपोर्ट स्टाफसदस्यांनाही चांगले मानधन मिळत असल्याचे पाहून बरे वाटते. आमच्या काळात मंडळाकडे पैसे नव्हते. या पूर्वीपासून वरिष्ठ खेळाडूंची काळजी घेतली आहे आणि घेतली पाहिजे. कुटुंबाने परवानगी दिल्यास पेन्शनची रक्कम दान करून आम्ही अंशुमनसाठी योगदान देण्यास तयार आहोत, असेही कपिल देव म्हणाले. बीसीसीआय देखील या साठी प्रयत्न करेल असा विश्वास देव यांनी व्यक्त केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग