पुण्यातील राऊत भावा-बहिणीचा आफ्रिकेत डंका, पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पुण्यातील राऊत भावा-बहिणीचा आफ्रिकेत डंका, पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली

पुण्यातील राऊत भावा-बहिणीचा आफ्रिकेत डंका, पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली

Oct 16, 2024 01:37 PM IST

Commonwealth Powerlifting Championship 2024 : चिंतामणी राऊत याने मुलांच्या ९३ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर कादंबरी राऊत हिने मुलींच्या सब ज्युनिअर ६९ किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व केले.

पुण्यातील राऊत भावा-बहिणीचा आफ्रिकेत डंका, पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली
पुण्यातील राऊत भावा-बहिणीचा आफ्रिकेत डंका, पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली

दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंगफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पुण्यातील हडपसर येथील कादंबरी राऊत आणि चिंतामणी राऊत यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर राऊत भावा बहिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंगफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण ९७ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

चिंतामणी राऊत याने मुलांच्या ९३ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर कादंबरी राऊत हिने मुलींच्या सब ज्युनिअर ६९ किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व केले.

सर्वप्रथम चिंतामणी राऊत पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात १५० किलो आणि बेंच या इव्हेंटमध्ये ७० किलो तर पॉवरलिफ्टींग डेड इव्हेंटमध्ये १८० किलो उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.

कांदबरी राऊतचा वर्ल्ड रेकॉर्ड

यानंतर कादंबरी राऊत हिने पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात जागतिक रेकॉर्ड केला. मागच्या वेळेस साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिने १४५ किलो उचलून जागतिक विक्रम केला होता. पण यावेळी कादंबरीने १५० वजन उचलून नवा विक्रम केला. यासोबत कादंबरी राऊत हिने स्कॉट इव्हेंचमध्ये सुवर्ण पदक कमावले.

यानंतर कादंबरीने बेंच इव्हेंटमध्ये ७५ किलो वजन उचलून रौप्य पदकाला गवसणी घातली, तर डेड या प्रकारात १४० किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवले. म्हणजेच एकूण कादंबरी राउत हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यसह एकूण तीन पदकं जिंकली.

प्राचार्य संजय मोहिते, प्रशिक्षक टी. बाकी राज, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय मोरे तसेच रवींद्र यादव आणि राजहंस मेहेंदळे व वडील बाळासाहेब राऊत यांचे ह्या दोघ्या बहिण भावांना मार्गदर्शन लाभले.

Whats_app_banner