RCB IPL 2023 : कोहलीच्या आरसीबीला मोठा झटका, हेजलवूड आयपीएलमधून बाहेर
Josh Hazlewood ruled out : विल जॅक्स दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याचवेळी आता संघाला आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत तो आरसीबीच्या किमान पहिल्या सात सामन्यांतून बाहेर राहू शकतो.
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) आज (३१ मार्च) पासून सुरू होत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू ५२ दिवस चालणाऱ्या या चित्तथरारक टी-20 लीगमध्ये आमनेसामने असतील.
ट्रेंडिंग न्यूज
मात्र ही स्पर्धा सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूला तगडा झटका बसला आहे. त्यांचा सर्वात महत्वाचा गोलंदाज जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत तो आरसीबीच्या किमान पहिल्या ७ सामन्यांतून बाहेर राहू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो संपूर्ण सीझनसाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलचेही पहिल्या सामन्यात खेळणे साशंक आहे.
आरसीबीला दुखापतीचे ग्रहण
फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खूप मजबूत मानला जातो. मात्र, यंदा संघ अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. विल जॅक्स दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
गेल्या वर्षी मॅक्सवेलचा पायला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाही. अलीकडेच मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले, पण विशेष काही करू शकला नाही. RCB त्यांचा पहिला सामना २ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू येथे खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर मॅक्सवेल पूर्णपणे बरा झालेला नाही. अशा स्थितीत पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे.
हेजलवूड १४ एप्रिलपर्यंत विश्रांती घेणार
त्याचवेळी हेजलवूड १४ एप्रिलपर्यंत विश्रांती घेणार आहे. त्यानंतरच पुढील सामन्यांचा निर्णय होईल. हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी आणि त्यानंतर वनडे मालिकेलाही मुकला आहे. हेझलवूडला आयपीएलच्या माध्यमातून अॅशेसची तयारी करण्याची आशा आहे.
संबंधित बातम्या