
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या प्रसंगी त्याने असेही सांगितले की, भारताला हरवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.
भारत-पाकिस्तान फायनल बघायची इच्छा नाही
दरम्यान, यावेळी बटलरला भारत-पाकिस्तान फायनल होईल का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने थोडी संतप्त प्रतिक्रिया दिली. बटलर म्हणाला की, 'नक्कीच मला भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना बघायची इच्छा नाही. भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांची पार्टी खराब करण्याचा आमचा प्रयत्न असेल".
डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या दुखापतीबद्दल बटलर काय म्हणाला
कर्णधार जोस बटलरने डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या दुखापतींबाबतही माहिती दिली. "ते दोघेही सेमी फायनलपूर्वी तंदुरुस्त होतील, असे बटलरने म्हटले आहे. दोघेही भारताविरुद्धचा सामना खेळू शकतील की नाही, हे आताच ठरवता येणार नाही, असेही बटलरने सांगितले
युझवेंद्र चहलबद्दल बटलर काय म्हणाला
फिरकीपटू चहलबाबत बटलर म्हणाला की, तो एक महान गोलंदाज आहे आणि तो नेहमीच विकेटच्या शोधात असतो. जर त्याला सेमी फायनल खेळण्याची संधी मिळाली तर ते भारताच्या दृष्टीने चांगलेचांगले असेल.
संबंधित बातम्या
