मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jofra Archer : मुंबई इंडियंस संघासाठी खुशखबरी! इंग्लंडच्या 'या'' वेगवान गोलंदाजाचे कमबॅक; विरोधी संघाचा उडवणार धुव्वा

Jofra Archer : मुंबई इंडियंस संघासाठी खुशखबरी! इंग्लंडच्या 'या'' वेगवान गोलंदाजाचे कमबॅक; विरोधी संघाचा उडवणार धुव्वा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 28, 2023 08:27 AM IST

Jofra Archer comeback : मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खुशखबरी आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर तब्बल दोन वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे.

Jofra Archer comeback
Jofra Archer comeback

नई दिल्ली: दक्षिण अफ्रीका आणि इंग्लंड दरम्यान, ३ सामन्यांची वनडे सीरीज शुक्रवार (दि २७) पासून सुरू झाली आहे. दोन्ही संघ दक्षिण अफ्रीकेतील मैंगौंग मैदानात भिडणार आहेत. दरम्यान, इंग्लंडसाठी एक खुशखबर आहे. गेल्या दोन वर्षांपासून जखमी झाल्याने संघातून बाहेर असणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने संघात पुनरागमन केले आहे. दोन वर्षानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहभागी होत आहे. आईपीएल सामन्यासाठी देखील तो सज्ज झाला असून तो बरा झाल्याने, मुंबई इंडियंसच्या संघात आनंदाचे वातावरण आहे. 

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा गेल्या दोन वर्षांपासून जखमी झाल्याने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तो लोवर बैकच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. यावर त्याने अनेकदा शस्त्रक्रिया देखील केली आहे.  जोफ्राने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा टी २० सामन्यात भारता विरोधात अहमदाबाद येथे खेळला होता. जोफ्रा सध्या या दुखापतीतून  बरा झाला असून आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पुन्हा आपला जलवा दाखवण्यास तयार झाला आहे. त्याने आपल्या ट्विटरवरून पोस्ट करत आपण २०२३मध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी तयार असल्याचे म्हटले होते.

मुंबई इंडियंसचा संघ खुश:

जोफ्राला मुंबई इंडियन्सच्या संघाने २०२२ मध्ये झालेल्या आईपीएल नीलामीत तब्बल ८ कोटी रुपयांमद्धे घेतले होते. मात्र, जखम झाल्यामुळे तो खेळू शकला नव्हता.२०२३ च्या बोलीत मुंबई इंडियन्सने त्याची पुन्हा निवड करत त्याला संघात स्थान दिले आहे. जोफ्रा मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी देखील खेळला आहे. आईपीएलमध्ये त्याने ३५ सामन्यात तब्बल ४६ विकेट्स घेतल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग