मराठी बातम्या  /  Sports  /  Joe Root Test Stats Eng Vs Ire Joe Root Break Sachin Tendulkar Record Of Scoring 11000 Runs In Less Age Know Details

Joe Root Test Record : जो रूटच्या ११ हजार कसोटी धावा पूर्ण, सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला

joe root 11000 runs in test cricket
joe root 11000 runs in test cricket
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 03, 2023 04:54 PM IST

joe root 11000 runs in test cricket : इंग्लंडचा फलंदाज जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला.

eng vs ire test match lords : सध्या इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी (eng vs ire test match) लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने ११ हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा गाठणारा जो रूट हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. माजी इंग्लिश खेळाडू अॅलिस्टर कुकने या आकड्याला पहिल्यांदा स्पर्श केला. दुसरीकडे, जो रूटने ११ हजार धावांचा टप्पा पार करत भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

११ हजार धावा करणारा दुसरा सर्वात तरूण खेळाडू 

वास्तविक, जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावा करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. रूटने वयाच्या ३२ वर्षे १५४ दिवसांत हा टप्पा पार केला, तर सचिन तेंडुलकरने वयाच्या ३४ वर्षे ९५ दिवसांत ११ हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. त्याचबरोबर या बाबतीत अॅलिस्टर कुक पहिल्या क्रमांकावर आहे. कूकने वयाच्या ३१ वर्षे ३५७ दिवसांत ११ हजार धावांचा टप्पा गाठला होता.

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ११वा खेळाडू आहे

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रूट हा ११वा खेळाडू आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या कारकिर्दीत १० हजार ९२७ कसोटी धावा केल्या. त्याचवेळी, कमी डावात ११ हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत रुटने अॅलिस्टर कूकला मागे टाकले आहे. रूटने २३८ डावांत हा आकडा गाठला. तर अॅलिस्टर कूकला हा आकडा गाठण्यासाठी २५२ डाव खेळावे लागले.

कसोटीमध्ये सर्वात जलद ११ हजार धावा करणारे खेळाडू

कुमार संगकारा - २०८ डावात.

ब्रायन लारा - २१३ डावात.

रिकी पाँटिंग - २२२ डावात.

सचिन तेंडुलकर - २२३ डावात.

राहुल द्रविड - २३४ डावात.

जॅक कॅलिस २३४ डावात.

महिला जयवर्धने - २३७ डावात.

जो रूट - २३८ डावात.

अॅलिस्टर कूक- २५२ डावात

शिवनारायण चंद्रपॉल - २५६ डावात.

अॅलन बॉर्डर - २५९ डावात.

WhatsApp channel