मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jio Cinema मुळे स्टार स्पोर्टसला बुरे दिन, मोबाईलवर IPL पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींनी वाढली

Jio Cinema मुळे स्टार स्पोर्टसला बुरे दिन, मोबाईलवर IPL पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींनी वाढली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 07, 2023 11:30 PM IST

IPL 2023 Viewership : आयपीएल 2023 चा पहिल्या सामन्याला टीव्हीवर सर्वात कमी प्रेक्षक संख्या मिळाली आहे. आयपीएलचा पहिला सामना गेल्या ६ मोसमांच्या तुलनेत टीव्हीवर (ipl 2023 tv viewership decreased) सर्वात कमी पाहिलेला सामना ठरला आहे. तर जिओ सिनेमाच्या दर्शकांमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे.

IPL 2023 Viewership Jio Cinema
IPL 2023 Viewership Jio Cinema

IPL 2023 Live Broadcast & Streaming : आयपीएल 2023 चा थरार सुरू झाला आहे. या मोसमातील पहिला सामना (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ विकेटने पराभव केला. त्याच वेळी, हा सामना मोठ्या संख्येने चाहत्यांनी Jio सिनेमावर लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहिला. वास्तविक, IPL 2023 च्या डिजीटल प्रसारणाचे हक्क Jio Cinema कडे आहेत. तर IPL 2023 च्या टीव्ही प्रसारणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट नेटवर्ककडे आहेत.

स्टार स्पोर्ट्सला मोठा धक्का!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा पहिला सामना गेल्या ६ सीझनच्या तुलनेत सर्वात कमी लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिला. तर जिओ सिनेमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आकडेवारीवरून असे दिसते की, लोकांनी टेलिव्हिजनवरील थेट प्रसारणापेक्षा जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यास अधिक प्राधान्य दिले. IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात स्टार स्पोर्ट्सने ७.२९ चा TVR नोंदवला. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात हा आकडा ८.२५ होता. तर IPL २०२० च्या पहिल्या सामन्यात स्टार स्पोर्ट्सचा TVR १०.३६ इतका गेला.

Jio सिनेमावर ५० कोटींहून अधिक लोकांनी पहिला सामना लाईव्ह पाहिला

IPL 2023 चा पहिला सामना Jio सिनेमावर ५० कोटींहून अधिक लोकांनी लाईव्ह पाहिला. अशा प्रकारे, जिओ सिनेमाच्या दर्शकांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, IPL 2023 च्या पहिल्या दिवशी, २.५ कोटींहून अधिक लोकांनी Jio Cinema अॅप डाउनलोड केले आहे, हा एक विक्रम आहे.

वास्तविक, IPL 2023 चे अधिकृत डिजिटल ब्रॉडकास्टर Jio Cinema आहे. याआधी आयपीएल सामन्यांचे अधिकृत डिजिटल प्रसारक डिस्ने प्लस हॉटस्टार होते.

WhatsApp channel