मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah: टीम इंडियात हे चाललंय तरी काय? बुमराह वनडे मालिकेतून बाहेर

Jasprit Bumrah: टीम इंडियात हे चाललंय तरी काय? बुमराह वनडे मालिकेतून बाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 09, 2023 02:13 PM IST

Jasprit Bumrah pulled out from odi series vs sri lanka: पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ पासून टीम इंडियातून बाहेर होता. आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेतही तो टीम इंडियाचा भाग नव्हता. दुखापतीतून सावरल्यानंतर तो बराच काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. अलीकडेच बुमराहला एनसीएने पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले होते.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

भारतीय क्रिकेट संघात अजब ड्रामा सुरू आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. जसप्रीत बुमराहला आधी या मालिकेचा भाग बनवण्यात आले नव्हते, पण नंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. आता पुन्हा एकदा त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह अद्याप गुवाहाटीला पोहोचला नाही, जिथे टीम इंडियाला १० जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळायचा आहे. ३ जानेवारी रोजी बीसीसीआयने एकदिवसीय संघात बदल केला होता. त्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला होता. 

पण एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळेच जसप्रीत बुमराहला शेवटच्या क्षणी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही घाई होऊ नये आणि त्याला परतण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल.  

बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर

२९ वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर आहे. टी-२० विश्वचषकही तो खेळला नव्हता. तेव्हापासून तो रिहॅबसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) होता. पण आता एनसीएने त्याला फिट घोषित केले आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली होती दुखापत

जसप्रीत बुमराहने २५ सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद येथे आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या सामन्यात बुमराहने ५० धावा लुटल्या होत्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला. त्यानंतर त्याची टी-२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली होती. पण शेवटच्या क्षणी त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली, त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर त्याने आता पुनरागमन केले आहे.

भारत-श्रीलंका वनडे मालिका

सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरु होतील

पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)

दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)

तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम

WhatsApp channel