मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians IPL 2023 : बुमराहची जागा कोण घेणार? मुंबई इंडियन्सच्या नजरेत ‘हे’ तीन गोलंदाज

Mumbai Indians IPL 2023 : बुमराहची जागा कोण घेणार? मुंबई इंडियन्सच्या नजरेत ‘हे’ तीन गोलंदाज

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2023 11:20 AM IST

jasprit bumrah IPL 2023 : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पाठीची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. बुमराहच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचे (Mumbai indians) टेन्शन वाढले आहे. कारण मुंबईला त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे.

jasprit bumrah replacement in ipl 2023
jasprit bumrah replacement in ipl 2023

jasprit bumrah replacement in ipl 2023 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पाठीची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. तो अनेक महिन्यांपासून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेर आहे. बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत बुमराह आयपीएल (IPL) त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमधून बाहेर पडेल, असे बोलले जात आहे.

जसप्रीत बुमराहची दुखापत टीम इंडियाला महागात पडणार आहे. कारण या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे. एवढेच नाही तर बुमराहच्या दुखापतीमुळे आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचेही टेंशन वाढले आहे. बुमराह आयपीएल २०२३ मधून बाहेर पडल्यास मुंबईला पर्याय शोधावा लागेल. खालीलपैकी एका गोलंदाजाला मुंबई इंडियन्स बुमराहच्या जागी आपल्या संघात स्थान देऊ शकते.

१) संदीप शर्मा :

Sandeep Sharma
Sandeep Sharma

संदीप शर्माने आयपीएलमध्ये अनेकवेळा शानदार कामगिरी केली आहे. परंतु त्याची गणना नेहमीच कमी दर्जाच्या खेळाडूंमध्ये केली जाते. संदीपने १०४ सामन्यांमध्ये ११४ विकेट्स घेतल्या आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता संदीप शर्माकडे आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी मुंबई संघाने त्याचा संघात समावेश केल्यास आश्चर्य वाटायला नको.

२) धवल कुलकर्णी :

Dhawal Kulkarni
Dhawal Kulkarni

वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. कुलकर्णी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सकडूनही खेळला आहे. ३४ वर्षीय कुलकर्णीने आतापर्यंत ९२ IPL सामन्यांत ८६ बळी घेतले आहेत. संदीप शर्माप्रमाणे धवलही पॉवरप्लेमध्ये शानदार स्विंग गोलंदाजी करू शकतो.

३) अर्जन नागवासवाला :

Arzan Nagwaswalla
Arzan Nagwaswalla

युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवाला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकला नाही. परंतु तो एक असा खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट्स घेत आहे. जसप्रीत बुमराहला पर्याय म्हणून मुंबई इंडियन्स या खेळाडूचा विचार करू शकते. २५ वर्षीय अर्जन नागवासवालाने मुश्ताक अली ट्रॉफीच्या २५ सामन्यात ३५ बळी घेतले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या